Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले असून या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे सध्या निवडणुकीमुळे सत्ताधारी महायुतीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ उडाला असून महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षाकडून जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 17 पैकी 12 जागांवर भाजप (BJP) निवडणूक लढवणार असून चार जागा शिवसेनेला (Shivsena) मिळणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खात्यात एक जागा जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपकडे 6 जागांची मागणी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील 3 जागांवर दावा केल्याने महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावर अंतिम निर्णय आतापर्यंत झालेला नाही.
जागावाटपावरुन महायुतीमध्ये सुरु असणाऱ्या घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे नारज झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा निर्णय घेत एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवसास्थानी भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तब्बल दोन तास सुरु असणाऱ्या या बैठकीत विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण आणि मंत्री बावनकुळे यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
या 17 जागांसाठी होणार निवडणूक
भंडारा-गोंदिया
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नाशिक
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
नांदेड
यवतमाळ
पुणे
धाराशिव-लातूर-बीड
परभणी-हिंगोली
छत्रपती संभाजी नगर-जालना
अमरावती
नागपूर
सोलापूर
अहिल्यानगर
ठाणे
जळगाव
सांगली-सातारा
पाकिस्तान देणार इस्त्रायलला मान्यता; डोनाल्ड ट्रम्प यांची नवी अट काय?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 1 जून शेवटचा दिवस असणार आहे.
