मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर (CM) भाजपच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत नितेश कुमार यांच्या सुधनावर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपाडा साफ केला. याबद्दल बिहार जनतेचे आभार मानतो. आपला विजयाचा रथ सातत्याने पुढे जात आहें. मोदींवर सर्वांचा विश्वास आहे. विरोधकांचा फेक नेरेटीव आपण हाणून पडला आहे. विरोधकांना जनतेत गेल्यावर कळेल नेमकं काय झालं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विरोधकांची पुन्हा हीच परिस्थिती होणार आहे असही ते म्हणाले आहेत.
भाजपाच्या वाटचालीत प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी सातत्याने आपली कार्यालये झाली पाहिजे, पक्षाला स्थैर्य अल पाहिले यासाठी खूप प्रयत्न केले. त्याकाळी मिळेल ते कार्यालय घेतलं. २०१४ साली सरकार आले. देशात अमित शहा यांनी सांगीतले प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय झालं पाहजे. तेव्हापासून प्रत्येक जिल्ह्यात जागा घेऊन परवानगी घेणे, हे काम सुरू आहे. कुठंही सरकारी किंवा अनधिकृत कार्यालय घ्यायचं नाही असंही ते म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री कोण ? भाजपची सावध भूमिका;ओबीसी कार्ड खेळणार ?
मराठवाड्यात सरकारने अनेक चांगली कामे केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील पिण्याच्या पाण्याची योजना आपण मंजूर केली आहे. इथे राष्ट्रवादी, उबठा यांना लाजही वाटत नाही. आंदोलन करणाऱ्यांच सरकार आल्यानंतर ८०० कोटी रुपये महापालिकेने भरावे असा निर्णय केला, यामुळे काम थांबलं. आता आपल सरकार आल्यानंतर पैसे दिले आहेत. यामुळे प्रत्येक घरात रोज पाणी मिळणार आहे.
आंदोलन करणाऱ्यांसारखे खोटारडे लोक नाहीत. यांना महापालिका निवडणुकीत जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आले आहेत. यातून मोठा रोजगार मिळाला आहे. देशाचा इलेक्ट्रिक वाहन कॅपिटल छत्रपती संभाजीनगर होत आहे, असही यावेळी फडणवीस म्हणाले.
समृद्धी महामार्गामुळे शहराला फायदा झाला, मराठवाड्यातील सिंचन, नदीजोड प्रकल्प सरकारने केले आहेत. शेतकऱ्यांवर संकट आल्यावर राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले आहे. उद्धव ठाकरे मराठवाड्यात आले तेव्हा अंबादास दानवे माणसं शोधत होते. लोकांना माहिती आहे यांच्याकडं काही नाही. आपल्याला प्रत्येक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवायचा आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजप मोठा पक्ष ठरणार आहे, असं मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.
