CM Fadnavis On Kunal Kamra : स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कामराला माहिती पाहिजे की, राज्याच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार, हे दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची वारसा कोणाकडे गेला, हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याविषयी अशाप्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
कोण खुद्दार आणि कोण गद्दार आहे हे जनतेने दाखवलं आहे
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण खुद्दार आणि कोण गद्दार आहे हे जनतेने दाखवलं आहे. अश्याप्रकारे अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कुणाल कामरा संविधानाचं जे पुस्तक दाखवत आहेत, ते त्यांनी वाचलेलं नाही.
संविधानात लिहलं आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता येणार नाही. त्यामुळे कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. स्टँडअप कॉमेडीन अशी कॉमेडी करू शकत नाही. व्यंग करण्याचा अधिकार आहे. जाणून अपमानित केले जात असेल. बदनामी करत असेल तर त्याला सहन केला जाणार. त्यावर कारवाई केली जाईल असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सध्या एकनाथ शिंदे विरोधातील गाण्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात गाणं म्हटलं आहे. त्यानंतर कुणाल कामराविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून कुणाल कामराचे लोकेशन शोधण्याचे काम सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.
नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर मनपाचा बुलडोझर
तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुणाल कामरावर कारवाई करण्याची माहिती दिल्याने आता कामराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासुन कुणाल कामरा याचा फोन बंद असून तो महाराष्ट्राच्या बाहेर आहे.