Download App

आता काही लोक म्हणतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार.. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर थेट वार

आपल्या पक्षाचे आजपर्यंत जे अध्यक्ष झाले ते सामान्य कार्यकर्ते आणि काहीच एकमेकांशी नातगोत नसलेला व्यक्ती अध्यक्ष झाला असंही

CM Devendra Fadnavis : आज फार महत्वाचा दिवस आहे. कारण, सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असलेले रविंद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. कारण भाजप हा कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे. अन्यथा, देशात 99 टक्के पक्ष असे आहे की, त्यांच्यामध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा दुसरा अध्यक्ष होऊ शकत नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी रविंद्र चव्हाण यांचं अभिनंदर करत इतर पक्षांना टोला लगावला आहे. ते मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आपल्या पक्षाचे आजपर्यंत जे अध्यक्ष झाले ते सामान्य कार्यकर्ते आणि काहीच एकमेकांशी नातगोत नसलेला व्यक्ती अध्यक्ष झाला असंही फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी रविंद्र चव्हाण हे भाजपसाठी कसे 24 तास काम करतात हेही त्यांनी येथे सांगितलं. यावेळी फडणवीस यांनी महनगर पालिकांच्या निवडणुकांचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसंच, हे आता कसे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे सांगितलं जाईल. परंतु, कुणाचा बापही आला तरी कुणी मुंबई महाराष्ट्रापासून दोडू शकत नाही असं म्हणत पुन्हा एकदा फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं आहे.

रविंद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती; माईंड गेम खेळत भाजपच देणार शिंदेंना शह

महाराष्ट्राच्या हित पाहतो

कोणाची युती झाली पाहिजे, कोणाची अयुती झाली पाहिजे, याच्यासाठी राजकारण करणार आम्ही नाहीत. महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारण करणारे आम्ही आहोत असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, युवांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, राज्याच 16 लाख कोटींचे करार करुन राज्याला प्रथम क्रमांकावर आणल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे. गरिब शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आम्हीला पाणी पोहोचवायचं आहे असे फडणवीस म्हणाले. दुष्काळाला आम्हाला भूतकाळ करायचे आहे. 2014 नंतर जे बोललो ते आम्ही करुन दाखवलो आहे. आम्ही बोलबच्चन देणारे नाहीत. भाषण मोठ मोठे करायचे आणि कर्तृत्व शून्य असे आमचे काम नाही. ये पब्लिक सब जाणती है असे फडणवीस म्हणाले.

follow us