महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याने आजपर्यंत काय केली. आणि त्यावर आता राज्य सरकारने काय कारवाई केली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केलं. यावेळी केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी (CM) खरात महिलांशी कसा वागला आणि त्याने काय काय केलं याबाबतही सविस्तर माहिती दिली.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. तो पळून गेला असता, तर त्याला शोधणे जिकरीचे ठरलं असतं. त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलन्स जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना १० मार्च २०२६ रोजी सादर केला व एअर अथॉरिटीने तत्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली.
वावी पोलीस स्टेशन व शिर्डी पोलीस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासात समोर आलेली गंभीर बाब गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, वावी व शिर्डी येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी १३ मार्च २०२८ विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आले.
भोंदू खरातकडं जाऊन जयंत पाटलांची रक्ताची अंघोळ, पडळकरांच्या आरोपांनी खळबळ
त्याचबरोबर दिनांक १७ मार्च २०२६ रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशन तक्रार दिली की, अशोक खरात याने स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र, तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलावून, तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेताल.
पुढे तिला गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन, तिला संमोहित करून, तिचं आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन, तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून, तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला. अशी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. पुढे खरातला दिनांक १७ मार्च २०२६ रोजी २३ वाजून ५९ मिनिटांनी तत्काळ अटक करण्यात आली अशी माहिती फडवीस यांनी दिली.
