Download App

NAAC: महाविद्यालयांना नॅक मानांकन गरजेचं, अन्यथा प्रवेशप्रक्रिया रद्द

  • Written By: Last Updated:

मुंबई: राज्यातील नॅक मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना आता नॅक मानांकन गरजेचं आहे अन्यथा प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात येणार असल्याचे आदेश उच्चतंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. नॅक मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्चतंत्र शिक्षण विभागाने 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे. राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे.

राज्यातील सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे गरजेचं असल्याच्या सूचना राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसं न केल्यास संबंधित महाविद्यालयांची येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे. अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं राज्यातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

Jayant Patil : शिंदे-फडणवीसांची घाबरगुंडी उडाली, निवडणूक घेण्याची हिंमत नाही 

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं त्या दृष्टिकोनातून या सर्व प्रक्रिया सर्व महाविद्यालयांनी पार पाडणे आवश्यक असल्याचं या आदेशात सांगितलं आहे. राज्यातील विनाअनुदानित 2141 महाविद्यालयांपैकी केवळ 138 महाविद्यालयांचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन पूर्ण झाल्याचे समोर आल्याने उच्चतंत्र शिक्षण विभागाने या विषयी गंभीर होऊन आदेश दिले आहेत.

 

Tags

follow us