Download App

Video : छ. संभाजीनगरमध्ये एन्काऊंटर, कशी घडली घटना?, आयुक्त प्रवीण पवारांनी दिली माहिती

बजाजनगर येथील रहिवासी उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी जबरी दरोडा टाकण्यात आला होता. याबाबत शहर पोलिसांनी तपासाला.

Encounter in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री एक थरार घडला. शहराजवळील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलीस आणि कथित दरोडेखोरामध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. (Encounter) आरोपीने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न केला. अखेर, पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि अमोल खोतकर नावाच्या आरोपीचा एन्काऊंटर झाला.

बजाजनगर येथील रहिवासी उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी जबरी दरोडा टाकण्यात आला होता. याबाबत शहर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. त्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर होता. त्याचा शोध घेतला असता त्याने त्यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून ती गेली, त्यात आरोपीनं गोळी देखील चालवली. प्रतिउत्तर देताना एपीआय रविकिरण गच्चे यांनी देखील गोळी चालवली. त्यात अमोल खोतकर गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तर त्याच्या सोबत असलेल्या एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे.

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून आरोपीचा एन्काऊंटर; नक्की काय घडलं?

बजाजनगर येथील आरएल सेक्टरमधील प्लॉट नंबर 93 मध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात १५ मे रोजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी तब्बल ५.५ किलो सोनं आणि ३२ किलो चांदी व रोख रक्कम लंपास केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लड्डा यांची वाळूज एमआयडीसीमध्ये दिशा ऑटो कॉम्प्स नावानं के २३७ भागात कंपनी आहे. ते कुटुंबीयांसह ८ मे रोजी विदेशात गेले आहेत. दरम्यान, संतोष लड्डा यांचा चालक संजय झळके हे घराची देखभाल करत होते.

ते रात्री घरात एकटेच झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. या दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी अमोल खोतकर होता, त्याच्याकडेच लुटलेला मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खोतकर यानं लुटलेले सोनं, चांदी शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

follow us