Download App

आता राज्यातील ‘या’ 10 हजार अधिकाऱ्यांचं कामबंद आंदोलन

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे राज्यशासन दुर्लक्ष करत राहिल्यानं राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी देखील संपाचे हत्यार उगारले होते. त्यातच आता पुन्हा एकदा हा संप पुकारल्याने सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील 10 हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

दरम्यान या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली नाही तर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंबंधी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर हे आरोग्य अधिकारी आज निदर्शनं करणार आहेत.

नेमक्या काय आहेत मागण्या?
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यात यावा
वेतन निश्चिती 36 हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन 40 हजार रुपये करण्यात यावं बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावं
यासह अशा अनेक मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे.

Tags

follow us