Radhakrishna Vikhe Patil : यापुर्वी कधीही झाली नव्हती आशी नैसर्गिक आपती पावसाने निर्माण केली आहे. झालेल्या नूकसानीचे सरकट पंचनामे अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीने करावेत.शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे आपतीग्रस्तांना मदत मिळेलच, परंतू विशेष बाब म्हणूनही मदत व पुनर्वसन विभागाकडे मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिल्या.
या संकटाप्रसंगी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही भेटी दरम्यान दिली. मागील दोन दिवसात जिल्हयात पावसाने झालेल्या नूकसानीची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील सोनवाडे, खडकी आणि वाळकी या गावांना भेटी देवून केली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा दिला. या नैसर्गिक संकटात सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. आ.शिवाजीराव कर्डीले (Shivajirao Kardile) , आ.काशिनाथ दाते (Kashinath Date) , माजी आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) , जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Pankaj Asia) , मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे डाॅ सुनिल तुंभारे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी नूकसान झालेल्या भागाची पाहाणी करताना प्रामुख्याने फुटलेले बंधारे,नाले आणि कालव्याच्या परीस्थितीची माहिती घेतली. मोठ्या स्वरुपातील पावसाने पाण्याचा प्रवाह सर्वत्र वाढल्याने बंधारे फुटले आहेत.शेतामध्ये मोठ्या स्वरूपात पाणी गेल्याने शेतजमीन खरडून गेली.जमीन पूर्णपणे नापीक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यापुर्वी असा पाऊस कधीही झाला नव्हता.काही तासात 118 मी.मी पावसाची झालेली नोंद ही मोठे संकट उभे करणारी ठरली आहे. यामुळे शेत जमीनी बरोबरच शेतात असलेल्या काही पीकांबरोबर उत्पादित मालाचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.
सर्व नूकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून,पंचनामे तातडीने व्हावेत म्हणून अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. काही भागातील जनावरे वाहून गेली आहेत. त्याबाबत पशुसंवर्धन विभागाने माहीती घेवून मदतीचे प्रस्ताव तयार करावेत. सद्यपरिस्थितीत चारा शिल्लक नाही ही समस्या मोठी निर्माण झाली असल्याने दुष्काळी परीस्थीतीत चारा उत्पादन करण्यासाठी विभागाने अनुदान दिले होते.मात्र आता चारा उपलब्ध करून तो ठरलेल्या दराप्रमाणे खरेदी करावा लागणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
नदीकाठच्या अतिक्रमणाचा विषय अतिशय गंभीर झाला आहे.याबाबत आता ठोस कारवाई करून उपाय योजना कराव्या लागतील.कालवे आणि तत्सम व्यवस्थेच्या आवती भोवती असलेली अतिक्रमण जलसंपदा विभागाने काढण्याच्या सूचना यापुर्वीच दिल्या आहेत. शहरातील अतिक्रमणा संदर्भात महापालिकेने कडक धोरण स्विकरण्याची गरज असल्याचे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले. अद्यापही पावसाचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही.मात्र नैसर्गिक परीस्थितीचे संकट पाहाता सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हाधिकारी आणि विविध विभागांच्या अधिकार्यांनी कालच्या प्रसंगात वेळीच उपाय योजना केल्याबद्दल समाधान व्यक्त करून शहरात स्लॅब कोसळून मुलीच्या झालेल्या मृत्यूची घटना दुर्देवी असल्याचे विखे पाटील म्हणाले. तालुक्यातील वाळकी गावातील रस्ता पावसाने वाहून गेला.
यामुळे गावातील दळणवळण ठप्प झाले आहे. मोठ्या स्वरुपातील असा पाऊस यापुर्वी कधीही पाहीला नसल्याची भावना स्थानिक जेष्ठ नागरीक, महिलांनी मंत्री विखे पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केली.वाळकीतही शेत जमीन जनावारांचे गोठे वाहून गेले आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील यांनी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देवून ज्यांच्या पीकांची सातबारा उतार्यावर नोंद नाही आशा शेतकर्याच्या मदतीसाठी सद्यस्थिती विचारात घेवून पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कर्जतच्या मेडिकल कॉलेजसाठी रोहितदादांची थेट फडणवीसांकडे फिल्डिंग; शिंदेंना भारी पडणार?
यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडे विशेष बाब म्हणून मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.पाणी कमी झाल्यानंतर भराव टाकून बंधारे ओढे नाले यांचे प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.