बबनराव पाचपुतेंना स्व पक्षातूनच आव्हान…इच्छुकांमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार

बबनराव पाचपुतेंना स्व पक्षातूनच आव्हान…इच्छुकांमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार

Babanrao Pachpute :  निवडणूक आयोग (Election Commission) येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. त्यामुळे आतापासूनच  इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. यातच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा (Srigonda) तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.  श्रीगोंद्यातून भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांना स्वपक्षातूनच आव्हान उभे राहिले आहे.

श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांच्या पाठोपाठ आता भाजपच्या सुवर्णा पाचपुते (Suvarna Pachpute) यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. नुकतेच शहरात सुवर्णा पाचपुते यांचे फिक्स उमेदवार सर्वसामान्य जनतेतील आमदार अशा आशयाचे बॅनर श्रीगोंदा मतदारसंघात लागले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय नेत्यांना तसेच इच्छुक उमेदवारांना विधानसभेचे वेध लागले आहे. इच्छुकांकडून देखील मतदार संघांमध्ये जनसंपर्क वाढवला जात आहे. नागरिकांच्या भेटीगाठी घेत आपल्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु ठेवण्यात आली आहे. यातच यंदा श्रीगोंदा जिल्ह्यातमध्ये उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच होणार असे चित्र निर्माण झाले आहे.  श्रीगोंद्यामध्ये बबनराव पाचपुते हे भाजपचे विद्यमान आमदार आहे. मात्र आता पाचपुते यांना पक्षातूनच आव्हान निर्माण झाले आहे.

सुवर्णा पाचपुते यांनी देखील विधानसभेसाठी इच्छुकता व्यक्त केली आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघातून भाजप आमदार पाचपुते यांना उमेदवारी देणारा का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

फिक्स उमेदवार सर्वसामान्य जनतेतील आमदार

आगामी विधानसभेपूर्वीच इच्छुक उमेदवार तसेच त्यांचे समर्थक यांच्याकडून पोस्टर, फ्लेक्सबाजी याद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. “फिक्स उमेदवार सर्वसामान्य जनतेतील आमदार” अशा आशयाचे सुवर्णा पाचपुते यांचे बॅनर श्रीगोंदा मतदारसंघात लागले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण तयारीत होतो मात्र पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितले म्हणून आम्ही थांबलो. परंतु, यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी आग्रही आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा सुवर्णा पाचपुते करत आहे.

कर्डिलेंकडून देखील श्रीगोंद्यात चाचपणी

2019 मध्ये राहुरी मतदार संघातून विधानसभा लढवणारे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी श्रीगोंद्यातून निवडणुकीसाठी चाचपणी सुरु केली आहे. याला कारण म्हणजे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी आपण राहुरी किंवा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलले होते. त्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघामधून प्रबळ दावेदार असणारे कर्डीले यांनी आपला मोर्चा श्रीगोंद्याकडे वळविला.

Explainer : अमेरिकेला का हवंय सेंट मार्टिन बेट? जाणून घ्या, बांग्लादेशच्या सत्तापालटाचं कनेक्शन..

कर्डीले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे असेही कर्डीले यांनी स्पष्ट केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube