Download App

Ahmednagar Name Change : अहमदनगरच्या नामांतराचं स्वागत पण… नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अहमदनगरच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकच्या घशाला कोरड : CM शिंदेंना पत्र लिहीत महाराष्ट्राकडे मदतीची याचना

नाना पटोले म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर अखेर अहमदनगरचं नाव आता अहिल्यादेवीनगर होणार आहे. राज्य सरकारच्या या नामांतराच्या निर्णयाचं स्वागतच आहे पण सत्ताधाऱ्यांनी राजमाता अहिल्याबाईंसारखा राज्यकारभार चालवावा, अशी अपेक्षा असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो IED बॉम्बसह 3 दहशतवाद्यांना अटक

तसेच सत्ताधारी सरकार द्वेष करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. राजमात अहिल्याबाईंनी कधीच द्वेष केलेला नाही, अहिल्याबाईंनी सर्वांना सोबत घेऊन राज्य चालवलं असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आहे.

Raveena Tandon: … म्हणून रवीनाला ‘टीप टीप बरसा पानी’ करायचं नव्हतं

तसेच नामांतरावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण नामांतर आम्ही केलं, असं भासवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. नामांतराच्या मुद्द्याचं राजकारण कुणीही करु नये, या शब्दांत पवार यांनी सुनावलं आहे.

बारामतीतील वैद्यकीय कॉलेज आता अहिल्यादेवी होळकर नावाने ओळखलं जाणार आहे. या निर्णयाचंही रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी अहमदनगरसाठी सरकारी रुग्णालय, शासकीय कॉलेज मंजूर करुन त्या रुग्णालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं असतं तर अधिक आनंद, स्वागत केलं असतं, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. काल राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर नाव देण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे जाहीर करून टाकले.

Tags

follow us