Raveena Tandon: … म्हणून रवीनाला ‘टीप टीप बरसा पानी’ करायचं नव्हतं
Raveena Tandon: बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल असणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आजही आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. मात्र लग्न होण्यापूर्वीच रवीना दोन मुलींची आई झाली होती. १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘मोहरा’ (Mohra Movie) हा सिनेमा चांगलाच जोरदार गाजला होता. अक्षयकुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी यांचा जबरदस्त परफॉर्मन्स आणि सुपरहिट गाण्याने या सिनेमाला आज देखील चाहत्यांची मोठी पसंती आहे.
https://www.youtube.com/watch?v=k1rmUZmHcAw
त्यात या सिनेमातील ‘टिप टिप बरसा पानी…(Tip Tip Barsa Paani) ’ या गाण्याने चाहत्यांच्या मनावर गारूड केलं. आजही या गाण्याचे रिमेक करून त्यावर थिरकायचा चाहत्यांना मोह आवरता येत नाही. या गाण्यातील अक्षयकुमार, रवीना टंडन यांच्या सुपरहॉट केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती. खासकरून या गाण्यामुळे रवीनाला एक वेगळीच ओळख मिळाली होती. परंतु या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी रवीनाने बऱ्याच अटी घातल्या होत्या.
View this post on Instagram
नुकतंच एका मुलाखतीत रवीनाने या गाण्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचे किस्से सांगितले आहे. तसेच पुढे रवीना म्हणाली की, या गाण्यांमध्ये कामुक जरी असली, तरी त्यामध्ये कोणती देखील मर्यादा ओलाडली नसल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. तुम्ही तुमच्या हावभावातून कामुकता दाखवू शकता, मग साडी परिधान केली आहे की अन्य काही याचा कोणालाही अजिबात फरक पडत नसतो.
या सगळ्या गोष्टी डोळ्यांत दिसतात आणि यालाच अभिनय म्हणत असतात. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अनेक ठिकाणी रवीना थोडी अवघडली होती. रवीना सर्वप्रथम या गाण्यावर काम करण्यास साशंक होती, पण नंतर तिने याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान काही अटीदेखील घालण्यात आल्या होत्या. याविषयी बोलत असताना ती म्हणाली की, “माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टी खूप स्पष्ट झाल्या होत्या.
मी गाण्यामध्ये साडी सोडणार नाही, कोणताही इंटिमेट सीन देणार नाही, अश्लील हावभाव करणार नाही. तसेच कीस देखील करणार नाही, या गोष्टी मी अगोदरच सांगितले असल्याचा खुलासा तिने आता केला आहे. याबाबत खूपच चर्चा केल्यानंतर आम्ही हे गाणं सादर करू शकलो. या गाण्यातून केवळ कामुकताच दर्शवण्यात आली आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान रवीनाला १०२ डिग्री ताप होता. अशावेळी देखील पावसाची काहीच लक्षणं दिसत नसल्याने कृत्रिम पावसाची सोय करण्यात आली आणि हे आयकॉनिक गाणं तयार करण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले आहे.