आशिष देशमुखांना काँग्रेसकडून तीन दिवसांचं अल्टिमेटम…

माजी आमदार आशिष देशमुखांना (Aashish Deshmukh) काँग्रेसकडून तीन दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याबद्दल विधान करणं देशमुखांना चांगलंच महागात पडलंय. तोपर्यंत देशमुख यांचं निलंबन करण्यात आलंय. 2 आत घातले पण 20 नवे येतील; आव्हाडांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एक खोका दिला जातोयं. मुख्यमंत्री शिंदे […]

Aashish Deshmukh

Aashish Deshmukh

माजी आमदार आशिष देशमुखांना (Aashish Deshmukh) काँग्रेसकडून तीन दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याबद्दल विधान करणं देशमुखांना चांगलंच महागात पडलंय. तोपर्यंत देशमुख यांचं निलंबन करण्यात आलंय.

2 आत घातले पण 20 नवे येतील; आव्हाडांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एक खोका दिला जातोयं. मुख्यमंत्री शिंदे लवकरच गुवाहाटीला असतील, एकनाथ शिंदेंकडून नाना पटोले यांना एक खोका दिला जातोय, असा दावा आशिष देशमुख यांनी होता.

‘बाळासाहेबांनी मला मोठं केलं तर, शरद पवार माझ्यासाठी’.. संजय राऊतांचे गौरवोद्गार

त्यानंतर आज काँग्रेसच्या मुंबईत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत शिस्तपालन समितीकडून आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ट्विटरचा लोगो पुन्हा बदलला, श्वानाच्या जागी आता…

देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून येत्या तीन दिवसांत त्यांना काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने उत्तर मागितलं असल्याचं समोर आलंय.

संजय राऊत यांनी पुन्हा राहुल कुल यांचे नाव घेतले…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज अखेर काँग्रेसच्या बैठकीत देशमुख यांचं उत्तर येईपर्यंत त्यांचं ते काँग्रेस पक्षातून निलंबित असणार आहेत.

या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते त्यामध्ये विशेषत: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह उल्हास पवार, भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर नाना पटोले यांच्यावर आमदार तांबेंकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. त्याचवेळी आशिष देशमुखांनीही नाना पटोलेंविषयी खळबळजनक दावा केला होता.

Exit mobile version