2 आत घातले पण 20 नवे येतील; आव्हाडांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल
Jitendra Awhad Criticise Shinde Goverment : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे सरकारवर रॅप करत टीका केली म्हणून सरकारने दोन रॅपरना अटक केल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. यावरुन आव्हाड हे सरकारवर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विट करत सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 2 आतमध्ये घातले पण 20 नवे येतील असे आव्हाडांनी म्हटले आहे.
उमेश खाडे आणि राज मुंगसे ह्यांना पोलिसांनी आत टाकून संविधान पायदळी तुडवले असल्याचा घणाघात आव्हाडांनी केला आहे. दोघे बहुजन समाजातले व्यवस्थे विरुद्ध बोलले काय चूक केली म्हणे गाण्यात शिव्या आहेत. बहुजन समाजाला शिव्या काय नवीन आहेत, असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भाजप-एमआयएम नेत्यांचं गुलूगुलू! आरोप सत्रानंतर काय आहे मनात सांग माझ्या कानात…
उमेश खाडे आणि राज मुंगसे ह्यांना पोलिसांनी आत टाकून संविधान पायदळी तुडवले
दोघे बहुजन समाजातले
व्यवस्थे विरुद्ध बोलले
काय चूक केली म्हणे गाण्यात शिव्या आहेत … बहुजन समाजाला शिव्या काय नवीन आहेत ..
आणि कोण म्हणते हे … पोलिस
पोलिस स्टेशन ला तुकोबाचे अभंग म्हणतात का …
तुझ्या… pic.twitter.com/KnBk1lqTsB— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 7, 2023
Eknath Shinde मी सर्वांना कामाला लावले : …म्हणूनच घरात बसणारे आता रस्त्यावर उतरलेत!
पोलिस स्टेशनला तुकोबाचे अभंग म्हणतात का? तुझ्या आई ची …… इथून सुरवात होते. पोलिस म्हणतात गाण्यात शिव्या आहेत पण नंतर हळूच म्हणतात परिस्थिती भयंकर आहे काय करणार. २ आत घातले २० नवीन येतील हे लक्ष्यात ठेवा, असे म्हणत त्यांनी सरकारला सुनावले आहे.
“भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा… pic.twitter.com/idlXsILz0m
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 7, 2023
दरम्यान, याआधी देखील त्यांनी एक ट्विट केले होते. “भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा, असे त्यांनी सरकारला सुनावले आहे.