Download App

“भाजपने मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं”, सुशांत सिंह प्रकरणात काँग्रेस नेत्याचा घणाघात

भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.

Sushant Singh Rajput : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ( Sushant Singh Rajput death) याच्या मृत्यूप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई न्यायालयात एक क्लोजर रिपोर्ट सादर (Bollywood) केला आहे, ज्यामध्ये मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे पुष्टी करण्यात आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.

रिया चक्रवर्तीला क्लिनचीट! सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत सीआयडीचा क्लोजर रिपोर्ट, आत्महत्या…

सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूने हजारो चाहत्यांना धक्का बसला होता. अनेक संशय व्यक्त केले जात होते. ज्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचे आरोप केले होते. त्याला उत्तर म्हणून रिया चक्रवर्तीने मुंबईत प्रति तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये सुशांतच्या बहिणींनी त्याच्यासाठी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) केलेले आरोप आणि रियाने सुशांतच्या कुटुंबावर केलेले आरोप या दोन्ही प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांतला कोणीतरी आत्महत्या करण्यास भाग पाडले होते, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सीबीआयला सापडला नाही. यामुळे याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लिनचीट मिळाली आहे.

सीबीआयने सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूची चौकशी बंद केली आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजपा वर उलटले आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी तसेच बिहार निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूचा भाजपाने गैरवापर केला. एवढेच…

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 22, 2025

सचिन सावंत यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

सीबीआयने सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी बंद केली आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजपवर उलटले आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी तसेच बिहार निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा भाजपाने गैरवापर केला. एवढेच नाही तर सीआरपीसीचे उल्लंघन करुन बिहारमध्ये झीरो एफआयआर नोंदवून सीबीआयकडे केस वर्ग करण्यात आली. यातून कायद्याचेही तीन तेरा वाजले. तीन तीन तपास यंत्रणा लावण्यात आल्या.

जागतिक दर्जाच्या मुंबई पोलीसांची बदनामी केली गेली. रातोरात लाखो फेक अकाउंट सोशल मीडियावर तयार करुन त्यामध्ये सुशांत सिंहच्या आत्म्यास बोलावण्याचे थोतांड पसरवून अनेक कथा रचून सुशांतची हत्या झाल्याचे व महाविकास आघाडी सरकारने ते दाबल्याचे चित्र तयार करण्यात आले. हल्ली हल्ली पर्यंत सातत्याने सुशांतसिंहचा सोशल मीडियावर विषय ट्रेंड करण्यात येत होता. एम्सने अहवाल देऊन अनेक महिने होऊन ही सीबीआय साडेचार वर्षे गप्प बसली.

मोठी बातमी! राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह 25 सेलिब्रिटींवर एफआयआर दाखल; कारण काय?

मी सातत्याने हा विषय लावून धरत होतो. रियासारख्या एका मुलीला भाजपाच्या गलिच्छ राजकारणात त्रास दिला गेला. सुशांतसिंगच्या नातेवाईकांना वेठीस धरले गेले. यातून सीबीआय व ईडीसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा राजकीय उपयोग होतो हे अधोरेखित झालेच पण त्यांची विश्वासार्हता ही प्रश्नांकित झाली आहे. पालघर साधूंचे प्रकरण असो वा दिशा सालीयनच्या मृत्यूची चौकशी असो विरोधी पक्षांची बदनामी करण्याचे भाजपाचे हीन राजकारण देशासाठी किती घातक आहे हे स्पष्ट होते असे सचिन सावंत यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या समर्थनात केलेल्या या पोस्टवर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us