Download App

राणे, भुसे अडचणीत येणार? काँग्रेस आमदाराच्या दाव्याने सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट

नागपूर : भाजप आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली आहे. ज्या सलीम कुत्ता प्रकरणावरुन सध्या वाद सुरु आहे त्या व्यक्तीची 1998 मध्येच हत्या झाली आहे. रोहित वर्मा, बाळू ढाकरे आणि संतोष शेट्टी या छोटा राजनच्या हस्तकांनी त्याची हत्या केली होती, आता जी व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये नाचत आहे ती सलीम मियाँ भाई आहे, असा मोठा दावा काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याने या वादात एक नवा ट्विस्ट आला आहे. (Congress MLA Kailas Gorantyal has claimed that Salim Kutta was killed in 1998.)

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टीत सहभागी झाल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी केला. या पार्टीची एक चित्रफितीही उघड केली. त्यानंतर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या प्रकरणात मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात वाद सुरु असून सध्या बडगुजर यांची चौकशी सुरु आहे.  या पार्श्वभूमीवर गोरंट्याल यांनी नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हा मोठा दावा केला.

Dawood Ibrahim : बॉम्बस्फोट, टार्गेट किलिंग अन्…; दाऊदने भारतात कोण कोणते गुन्हे केले?

काय म्हणाले कैलास गोरंट्याल?

नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली आहे. ज्या सलीम कुत्ता प्रकरणावरुन सध्या वाद सुरु आहे त्या व्यक्तीची 1998 मध्येच हत्या झाली आहे. रोहित वर्मा, बाळू ढाकरे आणि संतोष शेट्टी या छोटा राजनच्या हस्तकांनी त्याची हत्या केली होती, आता जी व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये नाचत आहे ती सलीम मियाँ भाई आहे. सलीम कुत्ता याची तीन लग्न झाली होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या तिन्ही पत्नींनी न्यायालयात जाऊन गोठवलेली संपत्ती सोडून द्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर टाडा न्यायालयाने देखील ही मागणी मान्य केली आहे, असा दावा कैलास गौरंट्याल यांनी केला आहे.

‘तुम्हाला मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का?’ विनोद तावडेंचं सूचक विधान

शुक्रवारी (15 डिसेंबर) रोजी राणेंनी बडगुजर यांचा सलीम कुत्ता सोबतचा फोटो विधानसभेत दाखवला. यानंतर मंत्री दादा भुसे यांनी ही बाब गंभीर असल्याचे म्हंटले. दाऊद इब्राहिम हा देशाचा नंबर वन शत्रू आहे. सुधाकर बडगुजर यांनी देशद्रोह्यासोबत पार्टी केल्यानं त्यांची चौकशी झाली पाहिजे, बडगुजर हा छोटा मासा आहे. त्याच्यावर वरदहस्त आहे, असं भुसे म्हणाले होते. त्यानंतर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Tags

follow us