‘तुम्हाला मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का?’ विनोद तावडेंचं सूचक विधान

  • Written By: Published:
‘तुम्हाला मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का?’ विनोद तावडेंचं सूचक विधान

Vinod Tawde : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू असतात. याच कारणामुळं काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आपले 145 आमदार निवडून आले तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, आता भाजपने तीन राज्यात धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्र्यांची निवड केली. हाच प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो अशी चर्चा आहे. याच अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंना (Vinod Tawde) प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल उत्तर दिलं.

दाऊदवर विषप्रयोग! डोंगरीच्या गल्लीतून ‘पाकिस्तानात’ कसा गेला अंडरवर्ल्ड डॉन? 

विनोद तावडे हे नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नागपुरात बोलताना त्यांनी अनेक सुचक वक्तव्य केली. यावेळी तावडेंना पत्रकारांनी पंकजा मुंडे भाजपकडून राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतील का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर तावडे यांनी मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का, असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला.

तावडे गमतीने म्हणाले की, हे माझ्यात हातात आहे. तुम्हाला पंकजा मुंडेंची खूप काळजी वाटते, तुम्हाला मी मुख्यमंत्री व्हावे असं वाटत नाही का? माझी पण कधी काळजी करा, असं तावडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर तावडेंच्या मनात मुख्यमंत्री बनण्याची सुप्त इच्छा असल्याचं बोलल्या जातं आहे. दरम्यान, दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनीही आपल्याला केंद्रीय राजकारणात रस असल्याचे सांगितले.

PM Modi : ‘तुम्हाला वाटतयं मी इन्कम टॅक्स पाठवेल’; दिव्यांग विद्यार्थ्याला असं का म्हणाले मोदी? 

यावेळी तावडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. तावडे म्हणाले की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप सामूहिक नेतृत्वाखाली लढवणार आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णयही एकत्रितपणे घेतला जाणार आहे. 2014 नंतर भाजपने राजकारणाची दिशा बदलली. आगामी लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या ४०० जागांचे भाजपचे लक्ष्य आहे, विनोद तावडे म्हणाले.

दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी देणारं भाजप हाच प्रयोग महाराष्ट्रात करणार का, आणि हा प्रयोग केला तर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube