Download App

LetsUpp Special : शरद पवारांना फक्त सहा जागा; नाना पटोले, थोरात आगीशी खेळतायेत?

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र  निर्माण झाले आहे.

त्याला निमित्त ठरले आहे ते लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election 2024) जागावाटपाचे. शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या तिघांत महाराष्ट्रातील जागावाटपाची बोलणी पडद्यामागे सुरू आहेत. त्यात इतर पक्षांना कसे स्थान द्यायचे यावरही अनेक मते आहेत. आता यावर काही ठिकाणी बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शरद पवारांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस हा पक्ष आता फुटला आहे. ती क्षीण झाला आहे. हे गृहित धरून काॅंग्रेसने हा जागावाटपाचा फाॅर्म्युला तयार केला आहे.

महाविकास आघाडीत सध्या मोठा पक्ष कोणता तर याचे उत्तर काॅंग्रेस हेच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची शकले झालीत. मूळ पक्ष म्हणविणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे अडचणीत सापडले आहेत. हे लक्षात घेऊन काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि दुसरे नेते बाळासाहेब थोरात यांनी हा फाॅम्युला तयार केल्याचे सांगण्यात येते.

आव्हाडांचा पवार कुटुंबियांशी थेट पंगा; रोहित पवार लहान, त्यांच्या विधानाकडे लक्ष देत नाही

यानुसार काॅंग्रेसला मोठा पक्ष म्हणून २१, शिवसेनेला १८, राष्ट्रवादी काॅंग्रेसला फक्त सहा जागा देण्याचा प्रस्ताव आहे. दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्या आहेत. राजू शेट्टी यांच्यासाठी एक जागा देण्याची तयारी आहे. पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीला आतापर्यंत महाराष्ट्रात कमाल ९ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने नेहमीच वीसच्या आसपास जागा लढविल्या आहेत. पण असे असताना पवार यांच्याकडे फारसा पक्ष शिल्लक राहिला नाही, असा समज काॅंग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यातूनच फक्त सहा जागा त्यांच्या वाट्याला देण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.

शरद पवार हे महाविकास आघाडीत असे तिसरे स्थान स्वीकारतील का, हा प्रश्नच आहे. सहा जागा लढवून पवार यांचे राष्ट्रीय पातळीवर काय स्थान राहणार, अशी शंका येऊ शकते. शरद पवार हे जागावाटपात काॅंग्रेसला आतापर्यंत खेळवत आले होते. आता ती संधी काॅंग्रेस साधत असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंकडे आधी जास्त खासदार होते म्हणून त्यांनी जास्त जागा मागितल्या आहेत. पण २०१९ मध्ये राज्यात काॅंग्रेसचा एकच खासदार होता. त्या काॅंग्रेसने २१ जागा कशाच्या आधारावर मागितल्या, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नक्की विचारणार. याउलट राष्ट्रवादीचे चार खासदार होते. असे असताना काॅंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला कमी जागा देण्याचे कारण नाना पटोले यांना सांगावे लागणार आहे.

Chhagan Bhujbal : ‘मीच शरद पवारांना सांगून आव्हाडांना मंत्री केलं’; इतिहास सांगत भुजबळांचा हल्लाबोल

अजित पवार हे साथ सोडून गेल्यानंतर शरद पवारांची ताकद कमी झाली आहे, हे काॅंग्रेसने स्वतःच्या मनावर बिंबवलेले दिसते. पवारांना उमेदवारही मिळणार नाहीत. त्यामुळेच कमी जागा दिल्याचा दावा काॅंग्रेस नेते करू शकतात. पण पवार अशी तिसऱ्या दर्जाची वागणूक स्वीकारण शक्य दिसत नाही. त्यामुळे काॅंग्रेसचा हा प्रस्ताव कसा पुढे जाणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

पवारांना शिरूर, बारामती, सातारा, माढा, नगर यासह जालना, बीड किंवा रावेर या तीनपैकी एक असेच काही मतदारसंघ देऊ केल्याचे दिसत आहेत. पण पवार हे एवढ्यावर समाधान मानणार नाहीत. त्यामुळे काॅंग्रेसला या प्रस्तावावर पुन्हा विचार करावा लागेल, अशी परिस्थिती आहे. अन्यथा ते आगीशी खेळत आहेत, हे नक्की.

follow us