Download App

Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदल? अंदाज घेण्यासाठी दिल्लीहून निरीक्षक

  • Written By: Last Updated:

विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) फेरबदल होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण बाळासाहेब थोरात  (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) एका व्यासपीठावर आल्याने या चर्चा पुन्हा थांबल्या होत्या. पण पुन्हा एकदा दिल्लीतून मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर अहवाल देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये सत्यजित तांबे यांच्या विधानपरिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या वादावर काँग्रेस हायकमांकडून एक सदस्यीय समिती नेमून नाना पटोले आणि थोरात-तांबे वादावर आढावा घेण्यास सांगितले आहे. दिल्लीतून नेमलेल्या या समितीमुळे पुन्हा एकदा राज्यात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

थोरात यांचा राजीनामा, पण ?

विधानपरिषद निवडणूक झालेल्या वादानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला होता व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत काम करू शकत नाही, असे म्हटले होते. थोरात यांच्या नाराजीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबईला येऊन थोरात यांच्याशी चर्चा केली होती.

एच. के. पाटील यांच्याशी चर्चनंतर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले एका स्टेजवर आले. पण थोरात यांचा निरोप घेऊन पाटील दिल्लीला गेले होते. खर्गे यांच्याशी चर्चेनंतर निरीक्षक म्हणून रमेश चेन्निथला येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा नवीन काय निर्णय घेतला जाणार याची चर्चा रंगली आहे. रायपूर अधिवेशनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र प्रदेशाचा निर्णय घेणार आहेत.

Tags

follow us