Download App

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक : राहुल गांधी प्रकरणावरुन मांडणार… 

  • Written By: Last Updated:

Prithviraj Chavan : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत केंद्र सरकारन सुडाच्या भावनेने कारवाई केली आहे. याबाबत मुख्यत चर्चा करत केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडणार आहे, असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच आगामी काळात प्रदेश काँग्रेस कशा पद्धतीने काम करणार आहे. याविषयीची चर्चा ठाणे येथील आज होणाऱ्या बैठकीत करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्ट्र काँग्रेसची ठाणे येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या या बैठकीत सगळ्या मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे.

इंदिरा गांधींंना नडणारे मोरारजी देसाई… ते पंतप्रधान! – Letsupp

आजची जी बैठक आहे ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारणी त्याचे विस्तारित स्वरूप आहे. काँग्रेस पक्षाची नेहमी मुंबईत बैठक होत असते. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या बैठका विभागावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी ही बैठक नागपूरमध्ये झाली होती. तर याच प्रकारे ही बैठक आता ठाण्यात आहे. या बैठकीत सगळ्या मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

 

Tags

follow us