Download App

मोठी बातमी! राहुल गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल

MLA Sanjay Gaikwad : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड

  • Written By: Last Updated:

MLA Sanjay Gaikwad : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, बुलढाणा काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये कलम 192 , कलम 351 (2), कलम 351 (4), कलम 351 (3) अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये (Buldhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बुलढाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसकडून चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस आमदार राजेश इकडे, धीरज लिंगाडे, प्रभारी कुणाल चौधरी , प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासीसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधी यांच्या मनातील ओठावर आलं. आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असं म्हणत राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ असं म्हटले होते.

… तर OTP मुळे तुमचे बँक खाते रिकामे होणार, सरकारने दिला इशारा

तसेच राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह सेट करुन मते घेतली आणि आज आरक्षण संपवण्याची भाषा केली. त्यामुळे काँग्रेसचा चेहरा बाहेर आला आहे. त्यांनी आरक्षणाची भाषा केली, जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस माझ्या वतीने देईल असे संजय गायकवाड म्हणाले होते. यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.

फॉर्म्युला ठरला, महायुतीमध्ये जागावाटपावर तिन्ही नेते एकमत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

follow us