राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ; शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

  • Written By: Published:
राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ; शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Sanjay Gaikwad Controversial statement On Rahul Gandhi : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील एका विधानावरुन सध्या राजकीय वातावण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधी यांनी परदेशामध्ये बोलताना आरक्षण संपवण्याचं विधान केल्याचा दावा करत भारतीय जनता पक्ष तसंच शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ, असं धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. या विधानावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी देशातील एक नंबरचे दहशतवादी; त्यांच्यावर तर; केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

काय म्हणाले संजय गायकवाड?

राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे, असं म्हणत जो राहुल गांधीची जीभ छाटेल , त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार, असं धक्कादायक विधान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. संजय गायकवाड यांच्या या विधानावरुन शिंदेंच्या आमदारांवर काही वचक आहे की नाही? असाच सवाल आता उपस्थित होत आहे.

११ लाखांचं बक्षीस

महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागण्यांची आग लागलेली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपणवण्याचं विधान केलं. लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट करुन मते घेतली. आज त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. काँग्रेसचा चेहरा अन् मळमळ त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. माझं आव्हान आहे, जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस माझ्या वतीने देईल,” असे संजय गायकवाड म्हणालेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे कर्ण; तर, फडणवीस आणि पवार..सदाभाऊंनी दिली ही उपमा

काय म्हणाले होते राहुल गांधी?

अमेरिकेमध्ये एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षणावरुन महत्वाचं विधान केलं होतं. भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, मात्र सध्या देशामध्ये तशी स्थिती नाही. योग्य वेळ येईल तेव्हा याबाबत विचार केला जाईल, असं राहुल गांधी म्हणाले होते. मात्र, राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचं विधान केल्याचा दावा करत भाजप तसेच समविचारी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधींच्या या विधानावरुन राज्यात भाजपने आंदोलनेही केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube