Download App

Rajesh Tope : वाढत्या कोरोनावरुन राजेश टोपेंचा शिंदे सरकारला सल्ला

Rajesh Tope On Corona :  गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यावरुन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारला सल्ला दिला आहे. राज्यामध्ये सध्या कोरोना वाढतो आहे पण सरकारने त्वरित त्याबाबत काळजी घ्यावी, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष करु नये, अशी सूचना देखील टोपे यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. कोरोनाने राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यावरुन राज्याचे माजी आरोग्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे  यांनी सरकारला सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये व मेट्रो सिटीजमध्ये सध्या कोरोना वाढताना दिसतो आहे, असे टोपे म्हणाले आहेत.

Corona Cases : मुंबईत कोरोनाची झपाट्याने वाढ, 10 दिवसांत वाढले एवढे रूग्ण

राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स  घेवून त्यासंदर्भातील सूचना तातडीने काढल्या पाहिजेत, असे टोपे म्हणाले आहेत.  अशातच देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या (Covid-19) रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये तर वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची देखील चिंता वाढली आहे.

ऋतुराजची छकडी, ५ लाखांचे बक्षीस, अन् सायलीचा पिवळा ड्रेस

त्यानंतर आता लोकांना मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन करण्याचं अवाहन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला देखील प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात येत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत होत असेलेली वाढ पाहता मुंबईत कोरोनाची झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us