Download App

सरकार दरबारी प्रश्न मांडण्यासाठी तोबा गर्दी; मंत्रालय ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोठी रांग…

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपली प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्य नागरिक थेट मंत्रालयातील संबंधित खात्याचे प्रमुख किंवा मंत्रिमहोदयांना भेटून व्यथा मांडत असतात. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आहे. व्यथा मांडण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मंत्रालयापासून ते थेट मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लांबच-लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं आहे.

Dry fruit: मधुमेहाच्या रुग्णांनीही आवश्य सेवन करावे असे 8 प्रकारचे ड्रायफ्रूट्स; न घाबरता आजचं आहारात समाविष्ट करा

दिवसागणिक मंत्रालयात राज्यभरातून अनेक नागरिक येत असतात. दर दिवस 5 हजार ते 6 हजार नागरिक आपल्या विविध मागण्या घेऊन येत असतात. आपल्या विविध मागण्यांसाठी अनेकांनी आत्तापर्यंत मंत्रालयातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांनी तर मंत्रालयातील सुरक्षा उड्या मारुन निदर्शने केल्याचं समोर आलेलं आहे.

स्वत:ला 10 अन् पक्षाला 14 तास द्या; देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

नागरिकांच्या प्रश्नांसाठी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली आहे. या बैठकीनंतर आता एक-एक करुन नगारिकांना मंत्रालयात प्रवेश देण्यात येत आहे. यावेळी नागरिकांना मंत्रालयात प्रवेश देत असताना त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या गेटवरच सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे.

कर्नाटकात गेलेल्या सोलापूरच्या डीजे ऑपरेटरचा मारहाणीत मृत्यू; काय आहे नेमकं प्रकरण?

सध्या मंत्रालयात महसूल, वन विभाग, आरोग्य, सांस्कृतिक, गृह विभाग, अन्न औषध, अन्न व नागरी पुरवठा, सहकार, क्रीडा, समाजकल्याण विभाग, अल्पसंख्यांक, कृषी, ग्रामविकास विभागाचे सचिव नागरिकांचे प्रश्न समजून घेत सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Moon Misson Isro : भारताची पुन्हा चंद्र मोहिम; जपानलाही सोबत घेऊन जाणार…

एकीकडे राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांतील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यानूसार राज्यातील अहमनगर, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांत कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनीही या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

यादरम्यान, मंत्रालयात कोणताही अनूचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांच्या फौजफाट्यासह सुरक्षा रक्षकांची फौज तैनात करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या मागील प्रवेशद्वारापासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
असल्याचं पाहायला मिळालं

Tags

follow us