Cyclone Murasu : चक्रीवादळ ‘मुरसू’ चा महाराष्ट्राला धोका; पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Cyclone Murasu : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मुरसू चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसून येत आहे.

Cyclone Murasu

Cyclone Murasu

Cyclone Murasu : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मुरसू चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसून येत आहे. या चक्रीवादळामुळे पुणे, नाशिकसह राज्यातील इतर ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगलीसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, या चक्रीवादळामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त, वातावरणाच्या वरच्या थरातील वेगवान वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलांमुळे ढग निर्मितीस पोषक वातावरण तयार झाले आहे. याच कारणामुळे महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे.

पुणे येथील भारतीय हवामान विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप (S. D. Sanap) यांनी सांगितले की, ‘मुरसू’ चक्रीवादळाचा (Cyclone Murasu) महाराष्ट्रावर थेट परिणाम नसला, तरी त्याच्या अप्रत्यक्ष प्रभावामुळे वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. पुणे, अहिल्यानगर आणि कोकण विभागाच्या काही भागांत तुलनेने अधिक पावसाची नोंद झाली आहे. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील काही भागांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असली, तरी संपूर्ण विदर्भात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

अहिल्यानगर, सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीत कुणी मारली बाजी? पहा संपूर्ण यादी

5 नोव्हेंबरनंतर हवामानात बदल

हवामान तज्ज्ञांच्या मते, आंध्र प्रदेशात धडकल्यानंतर ‘मुरसू’ चक्रीवादळ कोणत्या दिशेने पुढे जाते, यावर महाराष्ट्रातील हवामानावर होणारा परिणाम अवलंबून असेल. सध्याच्या अंदाजानुसार, 4 नोव्हेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आणि 5-6 नोव्हेंबरनंतर राज्यातील बहुतांश भागांत हवामान निरभ्र होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version