Gautami Patil Dance Show : डान्सर गौतमी पाटील ही गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गर्दीने धिंगाणा घातल्याचे दिसून आले आहे. तर काही वेळेला कार्यक्रमाच्या ठिकाणी अपघात झाल्याचे देखील दिसले आहे.
नुकतंच ६ मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात महालगाव या गावी गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देखील तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी उसळली होती. यावेळी अनेक लोक आपापल्या गच्चीवरून तर काहीजण दुकानांच्या वर चढून हा कार्यक्रम पाहत होते. यावेळी पोलीस गर्दीला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत होते.
40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच
तिचा डान्सचा कार्यक्रम सुरू असतानाच एक पत्र्याचे शेड कोसळले आहे. यामध्ये जे लोक त्या शेडवर चढलेले होते ते जखमी झाले आहेत. हा महालगावच्या बस स्टँडजवळ चालू होता. या दुर्घटनेत जवळपास 50 लोक खाली कोसळले आहेत, तर काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातील बेडग इथं गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
Karnataka Election: प्रचाराच्या तोफा थंडविल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आले अडचणीत
त्यावेळी देखील तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी झाली होती. त्यावेळी काही जण जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून हा कार्यक्रम पाहत होते. त्यावेळी शाळेच्या कौलारू छतांचा चुराडा झाला होता. त्या कार्यक्रमात लोक छतावर चढल्यामुळे शाळेची कौले फुटली एवढेच नाही तर कंपाउंडचे देखील नुकसान झाले होते. त्यानंतर आता अशीच घटना वैजापूर येथे घडलेली दिसून येत आहे.