40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच
कर्नाटकात सध्या 40 टक्क्यांचं सरकार सुरु असल्याच्या चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भर सभेतच म्हटलंय. कर्नाटक निवडणुकीसाठी आज निपाणीत शरद पवारांची सभा पार पडली. या सभेत कर्नाटकात सध्या काय चर्चा सुरु आहे? याबाबत शरद पवारांनी सांगितलं आहे.
IPL 2023: लखनौविरुद्ध झंझावाती खेळी, रिद्धिमान साहाचा खास विक्रम, रहाणे-रैनाला टाकले मागे
ते म्हणाले, कर्नाटकात 40 टक्क्यांचं सरकार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे, याबद्दल मला मुंबईस्थित कन्नड भाषिकांना सांगितलंय. तसेच मी मुंबईतल्या कन्नडी भाषिकांना निवडणुकीची काय परिस्थिती आहे, विचारलं होतं. त्यावर ते म्हणाले, सध्या कर्नाटकात 40 टक्के सरकारचीच चर्चा सुरु आहे.
Sonam Kapoor: ‘मला बायको अन् गर्लफ्रेंडसुद्धा…’ सोनम कपूरच्या नवऱ्याची ‘ती’ कमेंट चर्चेत
मला समजल्यानंतर मी म्हंटलो हे 40 टक्क्याचं सरकार काय भानगड आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, आता यापुढे हेच नवीन धोरण भाजपकडून देशभरात राबवण्यात येणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच ही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापरली पाहिजे.
मी मुख्यमंत्री असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील होते, चांगले स्वच्छ राजकारणा करणारे होते. आता सर्वत्र 40 टक्क्यांचं सरकार अशी चर्चा सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना पवारांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य केलंय. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी उमेदवार दिले. उत्तम पाटील यांना निपाणीमधून संधी दिली.