IPL 2023: लखनौविरुद्ध झंझावाती खेळी, रिद्धिमान साहाचा खास विक्रम, रहाणे-रैनाला टाकले मागे

IPL 2023: लखनौविरुद्ध झंझावाती खेळी, रिद्धिमान साहाचा खास विक्रम, रहाणे-रैनाला टाकले मागे

IPL 2023:  गुजरात टायटन्सचा सलामीवीर रिद्धिमान साहाने रविवारी (5 मे) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार खेळी केली. सलामीला फलंदाजीला आलेल्या वृद्धिमान साहाने 43 चेंडूत 81 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या खेळीनंतर साहाने अनुभवी सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान फलंदाज अजिंक्य रहाणे यांना मागे टाकत एक विशेष विक्रम केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 2 बाद 227 धावा केल्या. यामध्ये ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या वृद्धिमान साहाने पॉवरप्लेमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्लेमध्येच अर्धशतक करण्याचा विक्रम साहाने आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा केला आहे. आयपीएलमध्ये अशी कामगिरी दुसऱ्यांदा केल्यानंतर ऋद्धिमान साहाने सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणेला मागे टाकले.

आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज

पॉवर प्लेमध्ये रिद्धिमान साहाने दोनदा अर्धशतक झळकावले आहे. दोन अर्धशतकांसह केएल राहुलचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणे यांनी आयपीएल पॉवरप्लेमध्ये 1-1 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर ईशान किशन, यशस्वी जैस्वाल आणि सनी सोहेल यांनीही 1-1 वेळा हा पराक्रम केला आहे.

आशिया कपमधून पाकिस्तान आऊट?; भारताचं पारडं जड

IPL 2023 मध्ये ऋद्धिमान साहाची आतापर्यंतची कामगिरी

साहाने आयपीएल 2023 मध्ये 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना 27.30 च्या सरासरीने आणि 137.19 च्या स्ट्राइक रेटने 273 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून अर्धशतक झळकले आहे. तर साहाने आतापर्यंत 35 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत.

याशिवाय साहाच्या एकूण आयपीएल कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो आतापर्यंत 155 सामने खेळला आहे. या सामन्यांच्या 130 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 25.47 च्या सरासरीने आणि 128.76 च्या स्ट्राईक रेटने 2700 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 शतक आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube