आशिया कपमधून पाकिस्तान आऊट?; भारताचं पारडं जड
Asia Cup 2023: आशिया चषकच्या यजमानपदावरून बीसीसीआय (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे. त्याचवेळी बीसीसीआयच्या आक्षेपावर पीसीबीने (PCB) हायब्रीड मॉडेल सुचवले, पण बीसीसीआयने ते मान्य केले नाही. मात्र, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा धक्का दिला आहे. आशिया कपच्या (Asia Cup 2023) मुद्द्यावर दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला पाठिंबा दिला आहे.
आशिया कपच्या मुद्द्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला पाठिंबा दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी हायब्रीड मॉडेल सुचवले होते, मात्र आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला दिलेला पाठिंबा हा पीसीबीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Karanatak Election : राज ठाकरेंचं सीमावासियांना भलं मोठं आवाहन; म्हणाले ही संधी…
दुसरीकडे, पाकिस्तानी वाहिनी जिओ स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, जर आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला गेला नाही तर बांगलादेश व्यतिरिक्त श्रीलंका ही स्पर्धा आयोजित करण्यास तयार आहे.
तुमचं जेवढ आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण; भुजबळांनी पिळले राऊतांचे कान
अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी हायब्रीड मॉडेल सुचवले होते. या हायब्रीड मॉडेलनुसार आशिया कप पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार आहे. भारतीय संघ आपले सामने संयुक्त अरब अमिराती किंवा इतर कोणत्याही देशात खेळू शकतो. दरम्यान, बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या मॉडेलची सूचना पूर्णपणे नाकारली. त्याचवेळी आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे.