Karanatak Election : राज ठाकरेंचं सीमावासियांना भलं मोठं आवाहन; म्हणाले ही संधी…

Karanatak Election : राज ठाकरेंचं सीमावासियांना भलं मोठं आवाहन; म्हणाले ही संधी…

Raj Thackeray On Karanatak Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास पत्र लिहले आहे. या पत्रामधून त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मतदारांना आवाहन केले आहे. कर्नाटक राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे. मराठीसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा. मग तो कोणताही पक्षात असे ना, असे त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी केलेले आवाहन 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

तुमचं जेवढ आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण; भुजबळांनी पिळले राऊतांचे कान

मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.

ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.

आपला

राज ठाकरे

दुसऱ्याच्या संस्थेत घटना बदलून अध्यक्ष झालेले…; बावनकुळेंचा पवारांना टोला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube