Download App

अयोध्यावारीत उपमुख्यमंत्री फडणवीसांची उडाली धांदल…

प्रफुल्ल साळुंखे
विशेष प्रतिनिधी

अयोध्या दौऱ्यात अधिक गर्दी झाल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रोटोकॉलचा फटका बसला आहे. प्रोटोकॉलचा फटका बसल्याचं समजताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुठलाही बडेजाव न करता तत्काळ दिल्लीकडे रवाना झाल्याचं समोर आलंय.

Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूंची अलर्जी होतेय!

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्यात दाखल झाले असून मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही अयोध्येत दाखल होत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे.

अयोध्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरने लखनऊ येथून अयोध्येला आले. हेलिकॉफ्टरमधून एकच वाहनाने ते राम मंदिरात दाखल झाले. यावेळी आरती आणि पाहणी करुन सर्व जण हनुमान गढीकडे आले. हनुमान गढी इथं मुख्यमंत्री शिंदे यांची सभा सुरु झाली.

अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला, शेतीचं प्रचंड नुकसान

मात्र, फडणवीसांना नियोजनानूसार पुन्हा दिल्लीकडे यायचं होतं. त्यामुळे फडणवीस दिल्लीकडे माघारी निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सोडून फडणवीसांना माघारी परतावं लागलं आहे.

दिल्लीकडे रवाना होण्यासाठी देवेंद्र फडणवीस गर्दीतून वाट काढत गाडीजवळ आले. यावेळी फडणवीस यांना गर्दीत पाहुन मोहित कंभोज आणि गिरीश महाजनही धावत गेले. पण उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री यांच्या गाडीत आले होते.

आता सरकारी कार्यालये सकाळी 7:30 वाजता उघडणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

त्यामुळे त्यांच्या प्रोटोकॉलनूसार तिथे व्हॅन येऊ शकली नाही. त्यामुळे हनुमान गढी इथं प्रोटोकॉलची गाडी मिळाली नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गर्दीतून जात असलेल्या गाडीला थांबवत हेलिपॅडपर्यंत पोहचले आहेत. यावेळी कंभोज यांनी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीस यांनी कुठलाही बडेजाव न करता मिळालेल्या वाहनात बसून रवाना झाले.

तोपर्यंत पोलीस धावत गाडीकडे आले, पण फडणवीस यांची गाडी पुढे निघाली. पुढे जाऊन कंभोज यांनी एका पोलीस वाहनाच्या मदत घेतली. अखेर फडणवीसांनी हेलिपॅड गाठून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

Tags

follow us