Download App

जागावाटपाचा पेपर महायुतीने सोडवला आता फक्त…; फडणवीसांनी सगळं-सगळं सांगितलं

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 80 टक्के पेपर सुटला आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल्व्ह होतील

Devendra Fadnavis on Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाच्या चर्चा (Maharashtra Elections) सुरू आहेत. कोणता मतदारसंघ कुणाला द्यायचा याची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे जागावाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 80 टक्के पेपर सुटला आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल्व्ह होतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील जागावाटप लवकरच फायनल होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता..,फडणवीसांचा डायलॉगबाजीतून इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीतील (Haryana Elections 2024) भाजपाच्या यशावरही भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, भाजप हरियाणात पराभूत होईल आणि त्यांच्यावर आम्ही जोरदार टीका करू अशा तयारीत शरद पवार, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस बसले होते. पण देशाचा मूड आता त्यांच्याही लक्षात आलेला असेल.” हम साथ साथ है म्हणणारे आता हम तुम्हारे है कौन?” असे म्हणायला लागले असं पाहायला मिळत आहे. फेक नरेटीव आता संपला आहे, हे हरियाणाच्या निवडणुकीतून दिसून आलं. लोक आता भाजपच्या पाठीशी आहेत असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

आज माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस

वित्तमंत्री असताना आठ नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील पाच हे विदर्भातील आहे. याच पाच कॉलेजची सुरुवात होत आहे. यामध्ये गडचिरोली, भंडारा, वाशिम, बुलढाणा, वर्धा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री असताना नागपूर विमानतळाचं टेंडर दिलं होतं, त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं. साडेचार वर्ष कोर्टाच्या नंतर आता त्याला मान्यता मिळाली आहे. आज भूमिपूजन होत आहे. त्यामुळे आज माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. देशातील आधुनिक विमानतळ तयार होत आहे. कार्गो प्रवाशांची सोय, नागपूर आणि महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारं एअरपोर्ट ठरणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी कोणता प्रस्ताव दिला? तुतारी हाती घेताच पाटील म्हणाले, आता..

आमच्या सरकारच्या प्रयत्नाने अडीच वर्षांत 52 होस्टेल आज सुरू होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शहरात शिकण्यासाठी हक्काचं ठिकाण मिळत आहे. ज्या ठिकाणी होस्टेल नाही तिथे विद्यार्थ्यांना भत्ता सुद्धा देणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

follow us