DCM Eknath Shinde Criticize UBT in Mumbai : शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच यावेळी त्यांनी ठाकरेंना देखील टोला लगावला.
बॉक्स ऑफिसवर छावाची सिंहगर्जना! अवघ्या चार दिवसांत कमावले तब्बल 200 कोटी
यामध्ये ठाकरेंवर बोलताना शिंदे म्हणाले, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केले पण सकाळ संध्याकाळ त्यांनाही तुम्ही शिव्या देताय. उठता बसता तुम्ही शिव्या देताय तुमची शिव्यासेना झालीय का असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. तर महायुतीत तिनही पक्ष काम करत आहेत. कोणतेही कोल्ड वॉर नाही तर विकास विरोधी काम करणाऱ्यांच्या विरोधात आमचे युद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राहुल गांधींना मानहानी प्रकरणात दिलासा, पुण्यातील न्यायालयाने दिली मोठी सूट
यावेळी मुंबई जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं. तसेच त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना मोठे टार्गेट दिले. शिंदे म्हणाले की, शिवसेनेचा डंका देशभरात वाजण्यासाठी काम करा. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वार्डामध्ये 123 लोकांची नावं नोंदवायची हे टार्गेट प्रत्येकाला दिला आहे.
या आकड्यामागे 23 जानेवारी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने ठेवण्यात आले आहे. तर प्रत्येक वार्डामध्ये 5000 पेक्षा जास्त नाव नोंदणी करण्याचे टार्गेट ठेवा. कारण पक्ष मोठा केला तर तुम्ही मोठे व्हाल. त्यामुळे शिवसेना सदस्य नोंदणी आणि कार्यकर्ते वाढवा. ठाण्यामधून सुरुवात झालेल्या क्लस्टरच्या कामाला मुंबईमध्ये सर्वत्र पसरवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत.