राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा ; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांची मागणी

Balasaheb Thorat : राज्यामध्ये अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके जळून चालली आहे. संपूर्ण शेतकरी हवालदिल

Balasaheb Thorat

Balasaheb Thorat

Balasaheb Thorat : राज्यामध्ये अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके जळून चालली आहे. संपूर्ण शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना पंचनामे यांचा कोणताही फार्स न करता सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, राज्यभरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पंचनामे कुठले करता, असे काही न करता राज्यभरात सरसकट दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी अशी मागणी केली केली. याचबरोबर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी व्यापारी ग्राहक या सर्वांना अत्याधुनिक सुविधा दिली असून राज्यातील ही सर्वोत्तम बाजार समिती म्हणून ओळखली जात आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीची संकल्पना सुरू केली आणि ती देशभर गेली. बाजार समिती मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने तीन काळे कायदे काढले होते या विरोधात हरियाणा व पंजाब मधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन छेडले त्यात 700 शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले त्यानंतर त्या आंदोलन मागे गेले.

आपण महसूल मंत्री पदाच्या काळामध्ये या ठिकाणी उपबाजार करता 16 एकर जमीन मिळवली त्या माध्यमातून अत्यंत सुंदर परिसर येथे झाला आहे. खुली कांदा विक्री त्याचप्रमाणे भाजीपाल्यासाठी मोठे मार्केट या ठिकाणी आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. आता विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. आपण आंदोलनाची चर्चा केली आणि मागील दोन दिवसापासून वीज सुरळीत सुरू झाली आहे. विज बंद करणे म्हणजे पाणी पुढे नेणे असून याबाबत प्रत्येकाने जागृत झाले पाहिजे .पाणी गेले तर तालुका उध्वस्त होईल म्हणून आता आपण तयार राहिले पाहिजे. या प्रशासनावर धाक ठेवला पाहिजे असे सांगून 22 तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

तर आमदार डॉ तांबे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. ही रास्त मागणी शेतकऱ्यांची सरकारकडे आहे आपल्या बाजार समितीने शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याला पाण्याचा हक्क मिळाला. राज्यात संगमनेर तालुक्याला वैभव मिळाले. या बाबी पुढच्या तरुण पिढीला सर्वांनी सांगितल्या पाहिजे असे ते म्हणाले. तर डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, शेतकऱ्यांची सुंदर वास्तू आणि अद्यावत बाजार सुविधा या उपबाजारामध्ये निर्माण केली आहे. सरकारकडे शक्तीपीठ रस्त्याकरीता पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना देण्याकरता पैसे नसल्याची टीका त्यांनी केली.

तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने रेल्वे अत्यंत महत्त्वाची

निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. त्याचप्रमाणे तालुक्याच्या शेजारी विमानतळ निर्माण केले. हे पुढील अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गे मार्केट कमिटी उपबाजार पासून जवळून जात होती. संगमनेर तालुक्याच्या विकासाला गती मिळणार होती. जमीन अधिग्रहित करून अनेक शेतकऱ्यांना पैसेही दिले होते. या रेल्वे मार्गामुळे  आपला युवक व शेतमाल देशभरात जाऊ शकला असता मात्र कोणीतरी त्यामध्ये खुट्या ठोकल्या आणि हा मार्ग बदलला आणि संगमनेरचा नवीन लोकप्रतिनिधी रेल्वे मार्ग बदलण्यासाठी ती काय नेहरू गार्डन मधील रेल्वे आहे का असे बालिशपणे म्हणतो.

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या रॅकेटचा पर्दाफाश; अहिल्यानगर पोलिसांची कारवाई –

तालुक्याचे मूलभूत प्रश्न आणि रेल्वे बाबत एक शब्दही बोलत नाही. हे अत्यंत दुर्दैवाची आहे. ते बोलत नाही कोणतीही ठोस भूमिका घेत नाही म्हणून आता आपल्यालाच भूमिका घ्यावी लागणार आहे असे सांगताना तालुक्याचे वैभव मोठ्या कष्टातून उभे केले असून टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना संघर्ष करावा लागेल असे सांगितले.

Exit mobile version