Udhav Thackeray On BJP : ‘भाजप पुढची सत्ता बघत नाही’…उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातून हुंकार फोडला!

मराठवाड्यातला दुष्काळ आम्ही हटवू, आता भाजप पुढची सत्ता बघत नाही, असा हुंकार उद्धव ठाकरे यांनी जनआंदोलन सभेतून फोडलायं.

Udhav Thackeay

Udhav Thackeray On BJP : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनाची घोषणा केलीयं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित जनआंदोलन सभेतून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलंच फैलावर घेतलंय. मराठवाड्यातला दुष्काळ आम्ही हटवू, आता भाजप पुढची सत्ता बघत नाही, असा हुंकार उद्धव ठाकरे यांनी जनआंदोलन सभेतून फोडलायं.

पुढे बोलता उद्धव ठाकरे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकऱ्यावर रडण्याची वेळ आलीयं, तरीही सरकारकडून अद्याप पंचनामे सुरु झालेले नाहीत. येत्या 5 ऑक्टोबरपासून पंचनामे होतात की नाही तेच बघणार आहे. आता पुढील काळात मी, आदित्य आणि शिवसेना नेते स्वत: लक्ष ठेवणार आहोत. गद्दारांनी मराठवाड्याशी असलेल्या निष्ठा सत्तेसाठी विकल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा दुष्काळ आमचा आम्ही हटवू, भाजप पुढची सत्ता बघत नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

20 दिवसांच्या उपोषणात मनोज जरांगेंनी काय मिळवलं? कोणत्या मागण्या मान्य, कोणत्या अजून प्रलंबित?

काल अमित शाहा महाराष्ट्रात येऊन म्हणाले, महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे. तुम्ही हे गुजरात, तामिळनाडू, केरळमध्ये जाऊन बोलू शकता का? महाराष्ट्राची राजधानी मुंबई आम्ही हक्काने मिळवली आणि याचं मुंबईत येऊन अमित शाहा छातीठोकपणे सांगतो आहे, बाजूला गद्दार, सत्तालंपट बसून ऐकत होते. बाळासाहेबांचे हे विचार होते का? आमच्या राज्यात जातीपातीत मराठी भाषिकांना विभागत असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलायं. पेपरलिक प्रकरणी अभिजित दीपके यांनी आंदोलन केलं. अभिजित मराठवाड्याचा सुपूत्र, महाराष्ट्राचा सुपूत्र आहे. त्याला आम्ही पहिल्याच दिवशी पाठिंबा जाहीर केला. मुलांनी जे करुन दाखवलं ते आपण करु शकत नाही? जेन झींनी सरकारला गुडघ्यावर आणलं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

UPI ही सामान्य माणसाच्या व्यवहारातील गरज; शुल्काबाबतचा निर्णय मागं घ्या, राहुल गांधी आक्रमक

आमदारांप्रमाणे आता पुरस्कारही विकत घेतात..
सत्ताधारी सरकार जसे आमदार विकत घेत आहेत, त्याचप्रमाणे आता पुरस्कारही विकत घेत आहेत. एकनाथ शिंदे गुजरातला ढोकळा खायला गेलेत. एकीकडे मनोज जरांगे प्राणपणाने लढतायंत अन् तुम्ही इंग्लंडमध्ये पुरस्कार घेता, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीयं.

सरकारने आत्तापर्यंत घेतलेली भूमिका, सरकारी योजना, धोरणे सगळ्याच योजना फसव्या निघाल्या असून लाडकी बहिण योजनाही फसवी निघाली. आता राज्या भाजपने जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या आता भाजपला गेटआऊट सांगण्याची वेळ आलीयं. पुढील काळात बॅलेट पेपरवरुन संपूर्ण देश पेटला तर हे कसे बॅलेटवर निवडणूका घेत नाहीत तेच बघतो..असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

follow us