Malegaon Karkhana Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग गटातून 102 पैकी तब्बल ९१ मत घेऊन विजयी झाले आहेत. (Election) या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार हे चेअरमन पदाचे उमेदवार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत. आता या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे आहे. त्यामध्ये ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनीबाजी मारली आहे.
चार पॅनेल्स मैदिनात आहेत. या कारखान्याचे एकोणीस हजारांहुन अधिक मतदार आहेत. तर निवडणुकीला 88.48 टकक्के मतदान झालं होतं. निवडणूक लढवणाऱ्या नव्वद उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड मतदार आज करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी संघटांचे कष्टकरी शेतकरी पॅनेल अशी चार पॅनेल्स मैदानात आहेत.