पवार कुटुंबीयांच्या टीकेनंतर सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये! पहाटेच बारामतीत उतरल्या, अधिकाऱ्यांना दिला दम

अजित पवार यांच्य कार्यशैलीची आठवण करून देणाऱ्या पद्धतीने सुनेत्रा पावावर यांनी सकाळपासूनच प्रशासनाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले.

Untitled Design   2026 11 28T103433.184

Untitled Design 2026 11 28T103433.184

Deputy Chief Minister Sunetra Pawar in action mode : पुणे शहरातील कोयता गँगच्या वाढत्या कारवाया आणि बारामतीतील गुन्हेगारी घटनांमुळे उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये विरोधकांसोबतच पवार कुटुंबातील सदस्यांचा देखील समावेश आहे. अजित पवार यांच्यासारखी प्रशासनावर पकड आणि अधिकाऱ्यांवर जरब सुनेत्रा पवार यांना निर्माण करता येत नसल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आता भाष्य कारण्याऐववजी थेट मैदानात उतरून कामकाजाचा धडाका लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी पहाटेच शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. संबंधित विभागांचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी सुरू असलेल्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. विकासकामांची सद्यस्थिती, कामांचा वेग आणि गुणवत्तेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्य कार्यशैलीची आठवण करून देणाऱ्या पद्धतीने सुनेत्रा पावावर यांनी सकाळपासूनच प्रशासनाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले.

बारामतीतील विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, मात्र केवळ कामे उरकण्यावर भर न देता त्यांचा दर्जाही उत्तम असला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. सर्व संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामे करावीत. प्रत्येक काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच कामांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर काटेकोर लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. केवळ कागदोपत्री आढावा न घेता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन परिस्थिती जाणून घेण्यावर सुनेत्रा पवार यांनी भर दिला.

गद्दारांची मांदियाळी असताना…, डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांचा पाठिंबा अन् काँग्रेसची इमोशनल पोस्ट

अजित पवार यांची बारामतीतील कामकाजाची पद्धत सर्वश्रुत होती. पहाटेपासून कामाला सुरुवात करणे, अधिकाऱ्यांकडून कामांचा हिशेब घेणे आणि विकासकामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांना जाब विचारणे ही त्यांची ओळख होती. आता सुनेत्रा पवार यांनीही पहाटेपासून विकासकामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्याने त्या अजितदादांच्या कार्यशैलीच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, बारामती आणि पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सुनेत्रा पवार यांच्याविरोधात टीकेची धार वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँगच्या कारवाया पुन्हा चर्चेत आल्या आहेत, तर बारामतीमध्येही गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याने या घटनांवरून त्यांना लक्ष्य केले जात आहे.

विशेष म्हणजे, या टीकेमध्ये पवार कुटुंबातीलच रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांची नावे चर्चेत आली आहेत. अजित पवार यांच्या काळात प्रशासनावर असलेली पकड आणि अधिकाऱ्यांमध्ये असणारी जरब आता दिसत नसल्याचा सूर त्यांच्या टीकेतून उमटत आहे. अजितदादांच्या कामाची पद्धत वेगळी होती, अधिकारी त्यांना घाबरून असायचे; मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडून तशा पद्धतीने काम होत नसल्याची टीका केली जात आहे.

डिलिमिटेशन विधेयकानंतर देशाचा निवडणूक नकाशा बदलणार; ‘या’ राज्यात एकही जागा वाढणार नाही?

इतकेच नव्हे, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रिपद काढून घेण्याची मागणीही राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर केवळ प्रशासकीय आव्हान नसून, पवार कुटुंबातील राजकीय टीकेलाही सामोरे जाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात आणि प्रशासनात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर आहे. बारामतीकरांच्या अपेक्षा, विकासकामांचा वेग, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी अशा अनेक आघाड्यांवर त्यांना काम करावे लागत आहे.

अशा परिस्थितीत पहाटेच बारामतीतील विकासकामांच्या पाहणीसाठी बाहेर पडत त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. पवार कुटुंबातील सदस्यांकडून होत असलेल्या टीकेला त्यांनी थेट राजकीय प्रत्युत्तर दिलेले नसले, तरी प्रत्यक्ष कामकाजातून आपली कार्यशैली दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र, केवळ विकासकामांचा आढावा घेऊन प्रश्न सुटणार नाहीत. पुण्यातील कोयता गँगच्या कारवाया रोखणे, बारामतीतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे आणि प्रशासनाला अधिक उत्तरदायी बनवणे या बाबींमध्ये सुनेत्रा पवार किती प्रभावी ठरतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version