Download App

कल्याण प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, हे मराठी माणसाला हद्दपार…

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सत्तेत सामिल झालेली शिवसेना नामर्दाची आहे. कल्याणसारख्या घटना मुंबईत घडत आहेत.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : कल्याणच्या खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावरुन मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटल्याचे दिसत आहे. दरम्यान या प्रकरणावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Sanjay Raut) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये वातावरण तापलं, प्रकरण काय?

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सत्तेत सामिल झालेली शिवसेना नामर्दाची आहे. कल्याणसारख्या घटना मुंबईत घडत आहेत. निवडणुकीनंतर मराठी माणसांवर हल्ले वाढत आहेत. मुंबईत मराठी माणसांना जागा नाकारल्या जातात. मोदी शाह, फडणवीसांनी मराठी माणसांना कमजोर केले. मराठी माणसाला हद्दपार करण्याचे कारस्थान रचले जात आहे. कल्याणच्या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

follow us