Download App

तुमच्या छातीवर चढून राम मंदिर बनवले ! हिम्मत असेल तर या अयोध्याला; फडणवीसांचा हल्ला

  • Written By: Last Updated:

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी आज (25 डिसेंबर) पुण्यामध्ये भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अटल संस्कृती गौरव पुरस्कार या कार्यक्रमांमध्ये संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून ‘तुमच्या छातीवर चढून राम मंदिर बनवले ! हिम्मत असेल तर या अयोध्याला’ असं म्हणत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला.

तुमच्या छातीवर चढून राम मंदिर बनवले !

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांना एकदा लोकसभेमध्ये विचारण्यात आलं होतं की, तुमचा किमान समान कार्यक्रम समोर आला आहे. मात्र यामध्ये राम मंदिर नाही आणि 370 चा मुद्दा देखील नाही. यातून अटल बिहारी वाजपेयींना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यांनी सांगितलं आम्ही राम मंदिरही विसरू शकत नाही. 370 ही विसरू शकत नाही.

‘…तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही’; आंबेडकरांचा टोला…

सध्या आम्ही 22 पक्षांचं सरकार बनवलं आहे. त्यामुळे हा किमान समान कार्यक्रम हा 22 पक्षांचा आहे. मात्र ज्यावेळी या देशात माझ्या पक्षाचा सरकार येईल. तेव्हा राम मंदिरही बनेल आणि 370 आठवले जाईल. अटल बिहारी वाजपेयी यांचे हेच शब्द मोदी यांच्या सरकारने खरे करून दाखवले आहेत. कारण आता 370 हे कलमही हटवण्यात आलं आहे. तसेच येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन देखील आहे.

‘शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला

मात्र काही लोक आम्हाला विचारत आहेत की, राम मंदिर तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे का? मात्र हे तेच लोक आहेत. जे विचारायचे मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे. मात्र आम्ही तुमच्या छातीवर चढून मंदिरही बनवलं आणि तारीख देखील सांगितली. त्यामुळे हिम्मत असेल तर 22 जानेवारीला अयोध्येला. या तुम्हालाही राम मंदिर काय आहे? ते दाखवतो अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होतं. ते आम्ही पूर्ण करून दाखवलं आहे. असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us