‘शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला

‘शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला

Chandrashekhar Bawankule On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंमध्ये (Udhav Thackeray) निर्णय घेण्याची क्षमता नसून एक दिवस शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडून जातील, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती दिसून येत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलायं. ते पुण्यात बोलत होते.

Pune Loksabha : तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना ? सुनील देवधरांनी पुण्यात शड्डू ठोकला !

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, येत्या 22 तारखेला अयोध्येत रामलल्ला विराजमान होत असल्याचं काही लोकांना दुःख होत आहे. जेव्हा शरद पवारांनी अदानींच कौतुक केलं तेव्हा उद्धव ठाकरे एक तरी ट्विट करतील असं मला वाटले होतं, पण उद्धव ठाकरेंची निर्णय क्षमता कुमकुवत आहे, एक दिवस शरद पवार उद्धव ठाकरे यांना कंटाळून सोडून जातील. जसं सरकार गेलं त्याप्रमाणे निवडणुकीअगोदर महाविकास आघाडीचे तुकडे होतील, असं भाकीत बावनकुळेंनी केलं आहे.

काँग्रेसवर डोनेट फॉर देश मोहीम चालविण्याचा वेळ का आली ? काँग्रेस व भाजपकडे नक्की किती पैसा?

बारामती जागा आम्ही लढवणार असल्याचा दावा अजितदादांकडून करण्यात आला आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बारामती लोकसभेतून अजितदादा लढले काय आम्ही लढलो काय सारखंच आहे. बारामतीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार असून बारामतीची जागा महायुतीचा उमेदवार 51 टक्के मते घेऊन जिंकणार आहे. बारामतीतून जो उमेदवार ठरेल तो 51 टक्के मते घेऊन जिंकणार असल्याचा दावा बावनकुळेंनी केला आहे.

‘अजित पवारांच बंड हे स्वार्थासाठी…’; शालिनीताई पाटलांची सडकून टीका

तसेच महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही, अशी स्थिती होणार आहे. अनेक उमेदवार महाविकास आघाडी सोडून जातील. जागावाटपाबाबत महायुतीमध्ये राज्याचे तिन्ही नेते आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील. महायुतीतील घटक पक्षांनी जागेची मागणी करणं चुकीचं नाहीये. शेवटी प्रत्येक जागा आम्हाला जिंकायचीयं. महायुतीला जिंकण्यासाठी लढायचं आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील असा आमचा फॉर्मुला असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

जागांबाबत तिन्ही नेते अन् वरिष्ठ नेते निर्णय घेतील :
महाविकास आघाडीला उमेदवार देखील भेटणार नाहीत अशी स्थिती होणार आहे. जागावाटपाबाबत राज्यातील तिन्ही घटक पक्षाचे नेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. कोण किती जागा लढेल हे महत्वाचं नाही जिंकून येणं महत्वाचं असून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचा विश्वास बावनकुळेंनी यावेळी व्यक्त केलायं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube