Download App

Devendra Fadanvis असे का म्हणाले? सातत्याने जिंकणारे हरले की चर्चा होतेच…

मुंबई : एखादा सतत जिंकणारा उमेदवार पडला की चर्चा होतच असते. त्यात नवीन काही नाही. कसबा मतदार (Kasba Bypoll) संघातील आजच्या निवडणूक निकाल देखील त्याला अपवाद नाही. आम्ही सर्व्हे केला होता. त्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना लोकांची सहानुभूती असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, त्यांची सहानुभूती नंतर कमी होईल, असे आमचा अंदाज होता. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आमचा पराभव झाला. या पराभवाची आम्ही नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा येऊ, असा दावा करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पुन्हा एकदा ‘पुन्हा येऊ’ अशी घोषणा दिली आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक निकालानंतर दोन्ही मतदार संघातील विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कसबा मतदार संघात आमचा अंदाज चुकला. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत आमदार मुक्ता टिळक यांना जेवढी मते मिळाली होती. त्या तुलनेत आता हेमंत रासने यांच्या मतांची टक्केवारी निश्चितच कमी झाली आहे. त्याचे आम्ही आत्मपरीक्षण नक्कीच करू आणि २०२४ ची व्यवस्थित तयारी करून पुन्हा आम्ही येऊन कसबा जिंकून दाखवू, असे देखील त्यांनी दावा केला आहे.

मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं, ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली ३०-३२ वर्षे आम्ही कसब्यात सातत्याने निवडून येत होतो. अगदी दीड लाखांच्या मताधिक्याने देखील आमचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने लई हुरळून जाऊ नये. हा काही महाविकास आघाडीचा विजय नाही तर तो रवींद्र धंगेकर यांना लोकांची सहानुभूती होती. त्यामुळे ते निवडून आले आहेत.

Tags

follow us