Download App

मराठी यायलाच पाहिजे पण, हिंदी ही देशाची भाषा… फडणवीसांचा हिंदीला फुल सपोर्ट

Devendra Fadanvis यांना माध्यमांनी त्यांना नव्या शैक्षणिक धोरणाबाबत विचारलं. त्यावेळी त्यांनी हिंदी शिकण्याबाबत देखील प्रतिक्रीया दिली आहे.

Devendra Fadanvis On Hindi Language in New Education Policy : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी मराठी सह हिंदी भाषा शिकण्याबाबत देखील प्रतिक्रीय दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नव्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना मराठीसह देशाची भाषा देखील आली पाहिजे. कारण केंद्र सरकारने विचार केला आहे की, देशाची संपर्क भाषा एक असली पाहिजे. मात्र महाराष्ट्रात मराठी सक्तीचं करण्यात आलं आहे. पण ज्या कुणाला इंग्रजी, हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा शिकायची असेलं ती ते शिकू शकतात. त्यामुळे हिंदी ही देशातील एक संपर्क सुत्र राखणारी भाषा आहे. ती सर्वांनी शिकली पाहिजे. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नव्या आदेशात नेमकं काय

या धोरणानुसार आता राज्यातील शाळांत तीन भाषा शिकणे सक्तीचे राहणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यात काही शाळांमध्ये तिन्ही भाषा सक्तीने शिकवण्यात येतात. इंग्रजी आणि मराठीसोबत आता हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता राज्यात 5+3+3+4 अंतर्गत अभ्यासक्रम राहणार आहे.

वक्फ बोर्ड कायदा जैसे थे! सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला धक्का, सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

शाळांतील अभ्यासक्रमाची चार टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या पाच वर्षांत पायाभूत पातळी राहील. त्यानंतर तिसरी ते पाचवीपर्यंत पूर्वतयारी पातळी राहील. 11 ते 14 या वयापर्यंत पूर्व माध्यमिक पातळी, पुढे 14 ते 18 वयापर्यंत (नववी ते बारावी) असा शैक्षणिक आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.

follow us