Devendra Fadanvis On The Issue Of Removing The Waghya Statue At Raigad : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या विषयाला वाचा फोडली. (Statue ) त्यात त्यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरून हटवण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांच्या मागणीला विरोध करणारा गटही समोर आला. आता या विषयावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आयपीएस सुधाकर पठारे यांचे तेलंगणात निधन; कार व बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू
यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, प्रत्येक गोष्टीवर वाद घालणे गरजेचे नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे स्मारक किंवा पुतळा त्याठिकाणी आहे. तसेच त्यासाठी होळकरांनी निधी दिलेला आहे. त्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. तो पुतळा काढून टाकल्याने समाजाचा रोष वाढू शकतो. त्यामुळे त्यासाठी उगाच दोन समाजांनी एकमेकांवर चिखलफेक करू नये कोणताही समाज वेगळा नाही. अशी भूमिका यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे.
शिवाजी महाराजांच्या समाधीलगत वाघ्या कुत्र्याची समाधी हे अतिक्रमणच…
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड (raigad) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. हे अतिक्रमण आहे. त्यामुळे ते हटवावे, अशी मागणी माजी खासदार व रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Chhatrapati) यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र पाठविले आहे.
रुफ टॉप सोलरच्या घरगुती ग्राहकांना दिलासा! सोलर ग्राहकांना TOD पद्धत लागू होणार नाही
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे, असे पत्रात संभाजीराजे यांनी म्हटले आहे.