Download App

Devendra Fadanvis यांचा धक्का! अजितदादांची फाईल शिंदेकडे जाण्याआधी फडणवीसांकडे जाणार

Devendra Fadanvis : सत्तेत साहभागी झालेल्या अजितदादांना फडणवीसांनी (Devendra Fadanvis) एख धक्का दिला आहे. अजितदादांची शिंदेकडे जाणारी फाईल आधी फडणवीसांकडे जाणार आहे. त्यामुळे आता अजितदादांच्या अधिकार क्षेत्रात देखील फडणवीसांची नजर असणार आहे. सत्तेत साहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्याबाबत विविध चर्चा सुरूच आहेत. कधी ते मुख्यमंत्री होणार, कधी ते शरद पवारांना भेटतात. त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडणार अशा एक ना अनेक चर्चा होतात. मात्र त्यात आता अजित पवारांचे पंख शिंदे फडणवीसांनी छाटले आहेत. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Ethanol Price : इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली; लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची वाढ

मुख्यमंत्री शिंदेंनी दिला आदेश…

अजितदादांची शिंदेकडे जाणारी फाईल आधी फडणवीसांकडे (Devendra Fadanvis) जाणार आहे. तसा आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिला आहे. त्यानुसार ‘शासन कार्यनियमावलीच्या दुसऱ्या अनुसूचिमध्ये निर्दिष्ट केलेली सर्व प्रकरणे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मुख्यमंत्री शिंदेंकडे जाणार आहे.’ त्यामुळे आता अजितदादांच्या अधिकार क्षेत्रात देखील फडणवीसांची नजर असणार आहे.

Super Blue Moon तुम्ही पाहिलात का? चंद्राच्या मोहक दृश्यांनी वेधले लक्ष

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नेहमीच आपल्या बैठका, पत्रकार परिषदा आणि धडाडीच्या निर्णयांनी प्रसिद्ध असेलेल अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झल्यापासून त्यांच्या कामाचा झपाट लावला होता. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोलल जात आहे. त्यातूनच शिंदे फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांच्या या कामांना ब्रेक लावण्यासाठी हस्तक्षेरप केला असल्याचं देखील बोललं जात आहे.

काय आहे फाईलच्या प्रवासाचा नियम?

धोरणात्मक निर्णय किंवा मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या फाईल्स मंजुरीसाठी वित्त विभाग आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाते. वित्त विभागात त्या फाईलच्या आर्थिक बाबी तपासल्या जातात. तसेच त्यात कायदेशीर बाबी असल्यास ती विधी आणि न्याय विभागाकडे पाठवली जाते. तर मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर तो निर्णय आमलात येतो. मात्र आता अजितदादांची शिंदेकडे जाणारी फाईल आधी फडणवीसांकडे जाणार आहे. त्यामुळे आता अजितदादांच्या अधिकार क्षेत्रात देखील फडणवीसांची (Devendra Fadanvis) नजर असणार आहे.

Tags

follow us