Ethanol Price : इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली; लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची वाढ

Ethanol Price : इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली; लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची वाढ

Ethanol Price : इथेनॉलची किंमत (Ethanol Price) 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटकाबसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वीच सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. त्यात आता मात्र इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. त्यामुळे आता लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची जास्त मोजावे लागणार आहे.

Super Blue Moon तुम्ही पाहिलात का? चंद्राच्या मोहक दृश्यांनी वेधले लक्ष

केंद्र सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टीने सरकार प्रयत्न देखील करत आहे. तर 2024 या वर्षात 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळणार आहे. 2023 मध्येच 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळणार होते. मात्र ते शक्य न झाल्याने ते सध्या 11.77 टक्के मिसळले जाते. त्यात आता तांदूळ आणि मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलची किंमत (Ethanol Price) 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे.

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडट पदांसाठी भरती सुरू, हे उमेदवार करू शकतात अर्ज

त्यामुळे आता तांदळापासून तयार होणारे इथेनॉल 64 रूपये लीटर तर मक्यापासून तयार होणारे इथेनॉल हे 66 रूपायांना मिळणार आहे. या अगोदर 7 ऑगस्टला इथेनॉलची किंमत (Ethanol Price) वाढली होती. त्यानंतर आता इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. तसेच या दरवाढी मागे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणाचा वेग कायम ठेवण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube