Devendra Fadanvis यांनी विधानसभेतच भीमराव तापकीरांना झापले!

मुंबई : खडकवासला धरणात मैलामिश्रीत पाणी सोडले जात आहे. यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार का, अशी लक्षवेधी मांडत दुसरा प्रश्न १०० ते २०० एकरांत झालेली अनधिकृत बांधकामे राज्य सरकार नियमित करणार का, असा प्रश्न खडकवसल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव […]

Bhimrao Tapkir Devendra Fadanvis

Bhimrao Tapkir Devendra Fadanvis

मुंबई : खडकवासला धरणात मैलामिश्रीत पाणी सोडले जात आहे. यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार का, अशी लक्षवेधी मांडत दुसरा प्रश्न १०० ते २०० एकरांत झालेली अनधिकृत बांधकामे राज्य सरकार नियमित करणार का, असा प्रश्न खडकवसल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव तापकीर यांना सुरुवातीलाच झापले. फडणवीस म्हणाले भीमराव तापकीर यांनी प्रथम तर चुकीच्या विभागात लक्षवेधी मांडली. वस्तुतः ती नगरविकास विभागात मांडायला हवी होती. त्याचबरोबर दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाला परस्पर विरोधी मांडत आहे. त्यामुळे तुम्ही आधी प्रक्रिया समजून घ्या, असे सांगत फडणवीस यांनी तापकीर यांना पुन्हा झापले.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भीमराव तापकीर यांनी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी मांडली आहे. पण चुकीच्या विभागात मांडली. हे लक्षवेधी खरं म्हणजे नगर विकास विभागात तुम्ही मांडायला पाहिजे होती. जरी खडकवासला धरण हे जलसंपदाचा असलं तरी त्याच्यामध्ये येणारा जे काही हे सांडपाणी आहे. त्याचा रेगुलेशन करणं हे सगळं नगरविकास विभागाच्या आखत्यारित्या येते. तथापि मी एक सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देत आहे. मुळातच हे जे काही बांधकाम आहे किंवा अतिक्रमण आहे. हे आपली महत्तम पूररेषा त्याच्या बाहेरच आहे. महत्तम पूर रेषेपर्यंतची जमीन ही जलसंपदाणने संपादित केली आहे. त्याच्या बाहेरची जमीन ही जलसंपदा विभागाने संपादित केलेली नाही. खडकवासला धरणाच्या एका बाजूला तेरा गावे आहेत. तर डाव्या बाजूला दहा गावे अशी एकूण २३ गावे आहेत. मागच्या काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून २२ एप्रिल २०२२ रोजी एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये निर्णय केला होता.

Aditya Thackeray यांचे टेन्शन वाढले ? वरळीत काय होणार…?

जिल्हा परिषदेमार्फत जुन्या गावठाणा करता एसटीपी उभारून त्यासंदर्भातली कारवाई करावी. पीएमएमआरडीने जी काही नवीन हॉटेल, बंगले वगैरे झाले आहेत. त्याच्या करता एसटीपी तयार करावा. बंद स्थितीत असलेले काही एसटीपीएस सुरू करावे. पण त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात कुठली गती त्याला मिळालेले नाही. त्यामुळे पीएमआरडने पुढील तीन महिन्यांमध्ये त्यांनी या संदर्भातला आराखडा तयार करावा, अशा प्रकारच्या आदेश देण्यात येतील. जेणेकरून या भागात एसटीपी तयार करून कुठलेही घाण पाणी खडकवासलामध्ये जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version