Aditya Thackeray यांचे टेन्शन वाढले ? वरळीत काय होणार…?

  • Written By: Published:
Sandip Deshpande Aditya Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या काही महिन्यांपासून वरळी मतदार संघात येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा. माझं तुम्हाला चॅलेंज आहे, असं म्हणणाऱ्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचेच आता टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, आता वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे यांच्यासमोर तीन पक्षांचे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे भाजप, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे आव्हान तर आता त्यात आणखी भर पडली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढवली आहे. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी जर मला राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर मी वरळीच काय गडचिरोलीतूनही निवडणूक लढेल, असे म्हटल्याने आदित्य ठाकरे यांचे खरोखरच’टेन्शन’ वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

मागील काही महिन्यांपासून युवासेनेचे आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून रोड शो, प्रचार सभा घेत आहेत. या प्रचार सभांमधून आदित्य ठाकरे हे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच वरळीतून माझ्या विरोधात लढण्याचे आव्हान देत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप, शह-काटशाह देण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ विधानसभा निवडणुकीत वरळीमध्ये काय होणार आहे, याकडे आतापासूनच लोकांचे लक्ष लागले आहेत.

Hemant Rasne : हरलो, पण खचलेलो नाही, लढण्याची जिद्द…

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आता वरळी मतदार संघात उडी घेतली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक आहे. माझ्यासाठी राज ठाकरे यांचा शब्द अंतिम आहे. उद्या जर राज ठाकरे यांनी मला तू वरळी मतदार संघातून लढण्याचे आदेश दिले तर तो माझ्यासाठी अंतिम आदेश आहे. मी वरळीच काय अगदी गडचिरोलीमधूनही निवडणूक लढवण्याची तयारी करेल, असे म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासमोरच आता खऱ्या अर्थाने अडचणी वाढताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आधीपासूनच भाजपचे आव्हान उभे आहे. त्यात आता आणखी भर म्हणून एकनाथ शिंदे गटाने देखील आदित्य यांच्या विरोधात दोन हात करण्याची भाषा केली आहे. तर आता त्यात तिसऱ्या म्हणजे मनसे या पक्षाने देखील उडी मारल्याने आदित्य ठाकरे यांच्या समोरचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube