Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाकयुद्ध काही कमी होताना दिसत नाही. 2019 च्या राजकीय संत्तांतरावर आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत असतात. तसंच, अनेकवेळा फडणवीस यांनी वेगवेगे दावे केले आहेत. आजही त्यांनी या सत्तांतरासह उद्धव ठाकेंवर जोरदार घणाघात केला.
आम्हाला खिंडीत गाठायचं ठरवलं
देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केली नसती तर आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती आली नसती. त्याचबरोबर आम्हाला जे निर्णय घ्यावे लागले ते घ्यावे लागले नसते असंही फडणवीस म्हणाले आहेत. आज मतदारांचा विचार केला तर त्यांना मोदींना तिसऱ्यांदा निवडून आणायचं आहे असा दावा करत फडणणीस म्हणाले मोदींसह भाजपला खिंडीत गाठायच काहींनी ठरवलं होतं, पण आम्ही ते होऊ दिलं नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत.
ही बेईमानीच केली
2019 च्या विधानसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी नड्डा, अमित शाह यांचे बॅनरवर फोटो वापरून उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला. तसंच, या सभांमधून नरेंद्र मोदींसह सर्वांनीच देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील असं सांगितलं होतं. परंतु, निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना लक्षात आलं गणित बसणार नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सत्ता स्थापन केली. त्यांनी केलेली ही बेईमानीच होती असं फडणवीस यावेळी म्हणाले.
भाजपला थोडं खाली आणायचा प्रयत्न
यावेळी फडणवीस यांनी आणखी एक नवा खुलासा केला आहे. ते म्हणाले, 2019 च्या विधानसभेवेळी अगोदरच शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत बोलणी केली होती, असा धावाच फडणवीसांनी केला आहे. ही तयारी का केली होती तर भाजपला थोडं खाली आणू यासाठी ही तयारी केली होती असं म्हणत संख्याबळ जसं समोर आलं तशी उद्दव ठाकरेंनी बईमानी केली असंही फडणवीस म्हणाले.