Download App

फडणवीस उद्या मायदेशी परतणार; जपान दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं?

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जपान दौऱ्याच्या आज अखेरच्या आणि पाचव्या दिवशी त्यांनी सोनी (Sony), डेलॉइट आणि सुमितोमो (Deloitte and Sumitomo) कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्या आणि त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास महाराष्ट्र इच्छुक असल्याचं सांगितलं. त्यांनी सोनी समूहाला फिल्मसिटीमध्ये येण्याचं तसेच आयआयटी मुंबईशी संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची विनंती केली. तर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सुमिटोमोला मुंबई ट्रान्सहार्बर लिंकमुळं तयार होणाऱ्या तिसऱ्या मुंबईत असलेल्या संधीची माहिती दिली. दरम्यान, फडणवीस आपला पाच दिवसांचा दौरा आटोपून उद्या मुंबईत परतणार आहेत.

सोनी समूह कॉर्पोरेशनसोबत भेट
फडणवीस यांनी आज सोनी समूह महामंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरो कॅम्बे यांची भेट घेतली. सोनीला तंत्रज्ञान आणि कंटेट क्षेत्रात महाराष्ट्रासोबत काम करायची सोनीची इच्छा आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोनी हा भारतातील सुध्दा एक विश्वासार्ह ब्रँड आहे. मुंबई ही भारताची मनोरंजन राजधानी आहे आणि आमच्या फिल्म सिटीच्या विकासासाठी आमच्याकडे अनेक योजना आहेत. सोनीने या फिल्मसिटीमध्ये तंत्रज्ञान सहाय्य द्यावं.

शिरो कॅम्बे यांनी 80 च्या दशकात मुंबईत काम केल्याच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला. संशोधनाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करणार असल्याचे सांगत निश्चितच त्यात महाराष्ट्राला प्राधान्य राहील, असं त्यांनी सांगितलं. आयआयटी मुंबईनेही संशोधन क्षेत्रात मोठी गती घेतली आहे, असं फडणवीस यांनी सांगत सोनीला आयआयटी-मुंबईसोबत संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कोकणवासियांना बाप्पा पावला, मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरु होणार 

डेलॉईट तोहमत्सु समूहासोबत बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डेलॉइट तोहमत्सु समूहाच्या इको नागात्सू यांचीही भेट घेतली. ग्रीन हायड्रोजन, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, लॉजिस्टिक, इलेक्ट्रिक वाहने, हायस्पीड रेल्वे, स्टार्टअप आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जपानच्या मदतीने आज महाराष्ट्रात अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. डेलॉईट ज्या पद्धतीने सेमिनार रे आयोजित करते, त्याचप्रमाणे मुंबई आणि पुण्यातही ते आयोजित केले जावेत. तुमच्या सहकार्याने जास्तीत जास्त जपानी गुंतवणूकदार महाराष्ट्रात यावेत, हाच आमचा प्रयत्न असेल. आम्ही अशी गुंतवणूक आकर्षित करणं आणि या प्रक्रियेतील अडथळे दूर करणं, यासाठी जपानकेंद्रीत चमू आम्ही गठीत कऱणार आहोत. टोकियो टेक सारख्या कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र सरकारसोबत भागीदारी करण्यासारख्या पर्यायांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सुमिटोमोचा पुढाकार
सुमिटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष कोजुन निशिमा यांचीही आज फडणवीस यांनी भेट घेतली. धारावी पुनवर्सन प्रकल्पाबाबत राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली. एमटीएचएलमुळे मोठ्या प्रमाणात नवीन आवास क्षेत्र उपलब्ध होणार असून, तिसरी मुंबई ही पुढच्या काळात मोठी संधी असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सुमिटोमोचे अध्यक्ष कोजुन निशिमा यांनी यावर्षी अखेरपर्यंत आपण मुंबईत निश्चितपणे भेट देऊ, असे सांगितले. मेट्रो स्थानकानजीक उंच इमारती बांधण्यासाठी सुमिटोमोने उत्सुकता दर्शविली आहे.

Tags

follow us