कोकणवासियांना बाप्पा पावला, मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरु होणार
Mumbai-Sindhudurg-Mumbai Flight : ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav) कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील (Chippy Airport) मुंबई ते सिंधुदुर्ग (Mumbai-Sindhudurg-Mumbai Flight) ही विमान सेवा येत्या 1 सप्टेंबरपासून नियमित सुरु करण्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी केली आहे.
मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेनाचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सातत्याने पाठपुरावा करत होते.
चिपी विमातळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना रस्ते मार्ग, रेल्वेने कोकणात जावे लागत होते. काही लोक गोवा विमानतळाचा पर्याय निवडत होते.
‘ठरवलं… खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी’; रोहित पवारांचा हसन मुश्रीफांना इशारा
येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरुळीत सुरु करण्याची विनंती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार येत्या 1 सप्टेंबर पासून मुंबई ते सिंधुदर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरुन नियमितपणे सुरु करण्यात येईल तसेच दर आठवड्याला ही विमानसेवा सुरु असेल.
एअर अलांयन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत ही विमान सेवा सुरु करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यामार्फत विमान कंपन्यांना देण्यात येतील असे आश्वासन दिल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी दिली.
राज्यात राजकीय अस्थिरता नको, पक्षांतर बंदी कायदा कडक करा; शाहू महाराजांचा हल्लाबोल
आयआरबीने विमान प्राधिकारणाकडून करावयाच्या ज्या आवश्यक पूर्तता येत्या चार दिवसांत पूर्ण करुन देणार असल्याची ग्वाही आयआरबीच्या वतीने विरेंद्र म्हैसकर यांचे प्रतिनिधी व एअरपोर्ट संचालक किरण कुमार यांनी दिली.